घरमहाराष्ट्रShiv Sena First List : शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, खासदार...

Shiv Sena First List : शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, खासदार श्रीकांत शिंदेचे नाव नाही

Subscribe

मुंबई – शिवसेना शिंदे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली आहे. तिथीनुसार शिव जयंतीच्या मुहूर्तावर शिंदे गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. सात उमदेवारांच्या पहिल्या यादीत सहा विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

  • मावळ- श्रीरंग बारणे
  • रामटेक- राजू पारवे
  • हातकणंगले – धैर्यशील माने
  • कोल्हापूर- संजय मंडलिक
  • हिंगोली – हेमंत पाटील
  • बुलढाणा – प्रतापराव जाधव
  • शिर्डी – सदाशिव लोखंडे
  • दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाने पहिली यादी जाहीर करताना त्यांच्या सर्व विद्यमान खासदारांची नावे मात्र जाहीर केलेली नाही. रामटेकमधून शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले आहे. या मतदारसंघात त्यांनी काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे. शिवसेनेचे कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे आणि कल्याण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले आहेत. यापैकी ठाण्यातील खासदार राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत. ठाकरे गटाने त्यांना पुन्हा उमेदवारी देखील जाहीर केली आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितलेला आहे. या जागेबद्दल सुरु असलेला वाद अजून मिटलेला नाही असेच शिवसेनेच्या पहिल्या यादीवरुन दिसत आहे.

- Advertisement -

शिंदे गटाचे हेमंत गोडसे नाशिकमधून खासदार आहेत, तर यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी आहेत. या दोन्ही विद्यमान खासदारांचेही नाव पहिल्या यादीत जाहीर झालेले नाही. महायुतीमध्ये शिंदे गटाला नेमक्या किती जागा सोडण्यात आल्या हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदेच्या पुत्रासह नाशिक आणि यवतमाळच्या जागेची उमेदवारी घोषित झाली नसल्याचे बोलले जात आहे.

कल्याणमधून भाजपचे सहस्त्रबुद्धे, रवींद्र चव्हाण इच्छूक

कल्याण मतदारसंघासाठी भाजप आग्रही असून त्यासाठी माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पत्ता कट होईल, अशीच चर्चा काही महिन्यांपासून सुरु आहे. पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचे नाव न आल्यामुळे या चर्चांना खतपाणी मिळत आहे.

हेही वाचा : Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -