घरनवी मुंबईNavi Mumbai : औरंगजेबाचा फोटो whatsapp status प्रकरणी नवी मुंबईतून एकाला अटक

Navi Mumbai : औरंगजेबाचा फोटो whatsapp status प्रकरणी नवी मुंबईतून एकाला अटक

Subscribe

नवी मुंबई : राज्यातील अनेक शहरामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले जात आहेत. नवी मुंबईत (navi mumbai) औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सऍप स्टेटसवर ठेवल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी सकल हिंदू समाजाने एफआयआर दाखल केल्यानंतर वाशी येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. (Navi Mumbai: One arrested from Navi Mumbai in case of Aurangzeb’s photo whatsapp status)

मागील काही दिवसांपासून मुघल सम्राट औरंगजेबाचे उदात्तीकरण होतना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक दंगली झाल्या. या दंगलींवर पोलिसांनी नियंत्रण मिळवत शांतता राखण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा नवी मुंबईतील एका व्यक्तीने व्हॉट्सऍप स्टेटसवर औरंगजेबचा फोटो ठेवला. हे लक्षात येताच त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद, शिव शंभो प्रतिष्ठान, तसेच हिंदू सकळ समाज संघटना तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवारी (10 जून) संध्याकाळी 7 वाजल्यापासून जमा होऊ लागले. यानंतर पोलिसांनी वाशी येथून एका युवकाला अटक करून चौकशी सुरू केली.

- Advertisement -

नवी मुंबई शहर हे धार्मिक दंगलीसाठी प्रसिद्ध नाही, त्यामुळे औरंगजेबाजाच्या मुद्दावरून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शांततेचं आवाहन केले होते. याप्रकरणी वाशी येथील एका मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या दुकानात काम करणाऱ्या 29 ते 30 वर्षीय मोहम्मद हनिफ याने औरंगजेबाचा फोटो असलेले स्टेटस ठेवले होते. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आणि या व्यक्तीला नंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्याच्याविरुद्ध नोटीस जारी करण्यात आले.

पोलीसांच्या माहितीनुसार, औरंगजेबच्या फोटोचा व्हॉट्सऍप स्टेटस ठेवल्याचा स्क्रिनशॉट एका हिंदू संघटनेने पोलिसांना दिला होता, त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 298 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे इ.) आणि 153-ए (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान या कारणास्तव वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) असे कलम लावण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -