घरनवी मुंबईसिडको योजनेसाठी १९ हजार नागरिकांच्या अर्जांची नोंद

सिडको योजनेसाठी १९ हजार नागरिकांच्या अर्जांची नोंद

Subscribe

सिडको महामंडळाच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेकरता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरता, नागरिकांच्या विनंतीला मान देऊन २४ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला.

सिडको महामंडळाच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेकरता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरता, नागरिकांच्या विनंतीला मान देऊन २४ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडको महामंडळाने २६ जानेवारी रोजी ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेस प्रारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये ५७३० घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण ५,७३० घरांपैकी १,५२४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि उर्वरित ४,२०६ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आतापर्यंत १९ हजार नागरिकांनी अर्ज नोंदणी केली आहे. योजनेकरता अर्ज करण्यास २४ फेब्रुवारी २०२२ ही अंतिम तारीख होती. परंतु कागदपत्रांची जमवाजमवी करण्यास आणि अनामत रकमेची तजवीज करण्यासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात येत होती. या विनंतीला मान देऊन अर्ज नोंदणी करण्याकरता २४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता सिडको नेहमीच कटिबद्ध आहे. सिडकोच्या नवीन वर्षातील या पहिल्या योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला आहे. कागदपत्रांची जमवाजमव आणि अनामत रकमेची तजवीज करण्यास पुरेसा अवधी मिळावा म्हणून अर्ज नोंदणीकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.
– डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

- Advertisement -

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाइन अर्ज नोंदणी २४ मार्चपर्यंत करता येणार आहे. नोंदणीनंतर ऑनलाइन अर्ज व ऑनलाइन शुल्क भरणा २५ मार्चपर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी ३१ मार्च रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी ४ एप्रिलला सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ८ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

हेही वाचा –

12th Board Exam : बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, ५ आणि ७ मार्चचे पेपर पुढे ढकलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -