Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई ऐरोली-कळवा उन्नत मार्गातील बाधितांचे पुनवर्सनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

ऐरोली-कळवा उन्नत मार्गातील बाधितांचे पुनवर्सनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Subscribe

दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्वास आले तरी स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या प्रकल्पात सहभागी असणार्‍या एमएमआरडीए, एमआरव्हीसी, रेल्वे आणि ठामपा यांच्यामुळे अधांतरी राहिला आहे. सदर प्रकल्पातील बाधितांच्या पुर्नवसनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका कार्यक्रमा दरम्यान भोलानगर रहिवासी गृहनिर्माण एकता संघाच्या सदस्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

नवी मुंबई: ठाणे स्थानकातील गर्दीचे विभाजन आणि कळवा-मुंब्रा स्थानकातील लोकलवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी आखलेल्या कळवा-ऐरोली उन्नत एलिव्हेटेड (उन्नत) पुलाच्या कामाचे काम मागील सात वर्षापासून रखडले आहे. या पुलाच्या कामात बाधित होणार्‍या नवी मुंबई व ठाणे क्षेत्रातील नागरिकांनी नजीकच्या परिसरातच संपुर्ण रहिवाशांचे एकत्रितपणे पुर्नवसन करण्याची मागणी लावून धरली आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्वास आले तरी स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या प्रकल्पात सहभागी असणार्‍या एमएमआरडीए, एमआरव्हीसी, रेल्वे आणि ठामपा यांच्यामुळे अधांतरी राहिला आहे. सदर प्रकल्पातील बाधितांच्या पुर्नवसनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका कार्यक्रमा दरम्यान भोलानगर रहिवासी गृहनिर्माण एकता संघाच्या सदस्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
सन-२०१६ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक आणि ऐरोली-कळवा एलिव्हेटेड मार्गाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम फेब्रुवारी-२०२३ मध्ये पुर्ण करण्यात आले. परंतु एमयूटीपी-३ प्रकल्पातील उन्नत मार्ग मात्र रखडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोलानगरची वास्तविकता लक्षात घेता त्यांचे नजीकच्या परिसरात शासकीय जागेवर, मफतलालच्या जागेवर किंवा एमआरव्हीसी व एमएमआरडीएने इतर शासकीय जमिन ताब्यात घेऊन तसेच केंद्र, राज्य आणि ठामपाच्या माध्यमातून एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन करुन पुलाचे काम सुरु करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

समन्वयाअभावी प्रकल्प रखडला
ठाणे-वाशी ट्रान्स मार्ग, कल्याण-वाशी मालगाडीचा ट्रॅक, सीएसटी ते कर्जत फास्ट ट्रॅक अशा जीवघेण्या स्थितीत राहत आहे. ट्रान्स हार्बर व तुर्भेकडे जाणार्‍या मालगाडीसाठी या ठिकाणच्या जमिनीही देण्यात आल्या आहेत.उन्नत मार्गामुळे जीवघेण्या तीन ट्रॅकमधून सुटका होईल, अशी अपेक्षा असताना या प्रकल्पात काम करणार्‍या चारही प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी स्थानिकांशी वारंवार मागणी असून माजी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनीही बैठक घेऊन निर्णय घेण्याचे कळवूनही कोणतीही हालचाली अधिकार्‍यांकडून करण्यात न आल्याने समन्वयाअभावी हा प्रकल्प रखडला आहे.

- Advertisement -

भोलानगरातील रहिवाशांचा विरोध
ठाणे व नवी मुंबईच्या वेशीवर असणार्‍या भोलानगर परिसरातील नागरिकांनी या परिसरातील नागरिकांचे सरकट पुर्नवसन करावे, घोडबंदर येथील रेंटलहौसिंग सोसायटीत जाण्यास विरोध करत त्याच प्रमाणे स्थानिकांच्या रोजगाराच्या मागणीसाठी लांबच्या जागेत जाण्यास नकार देत सर्व्हे होऊ दिला नाही. या प्रभागाचा सर्व्हे करणार्‍यासाठी एमआरव्हीसीने नेमलेल्या संस्थेकडून पहिल्यांदा बायोमॅट्रीक सर्व्हे देखील झाला आहे. इतकेच नाही तर भोलानगरमधील नागरिकांचे सरकट पुनर्वसन करणार असल्याचे एमआरव्हीसीने सांगितले होते. परंतु त्यानंतर भुमिका बदलत भोलानगरमधील अवघ्या ९६७ घरांपैकी अवघ्या ३४७ घरांचे घोडबंदर येथील रेटंल हौसिंग सोसायटीमध्ये भाडे तत्वावरील घरामध्ये जाण्यास १९७० पासून भोलानगरात वास्तव्य करणार्‍या स्थानिकांनी विरोध केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -