घरनवी मुंबईतिस-या टप्प्यातील कोविड १९ लसीकरण सुरू

तिस-या टप्प्यातील कोविड १९ लसीकरण सुरू

Subscribe

1 मार्चपासून तिस-या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात

शासन निर्देशानुसार 16 जानेवारीपासून कोव्हीड 19 लसीकरणास डॉक्टर व इतर आरोग्यकर्मी कोरोना योध्यांपासून सुरुवात करण्यात आली असून दुस-या टप्प्यात पोलीस, सुरक्षा व पहिल्या फळीतील इतर कोरोना योध्यांना लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय निर्देशाप्रमाणे 1 मार्चपासून तिस-या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करण्यात आलेली असून यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (को – मॉर्बेडिटी) असणारे 45 ते 59 वर्ष वयाचे नागरिक यांना लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 वर्ष वयाच्या सहव्याधी असणा-या नागरिकांना लस घेण्याकरिता वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांचे संबंधित प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

केंद्र सरकारमार्फत सहव्याधी (को – मॉर्बेडिटी) निश्चित करण्यात आल्या असून यामध्ये पल्मनरी आर्टरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट अशा व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आला असून त्याच नमुन्यामध्ये प्रमाणपत्र सादर करणे / अपलोड करणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

तिस-या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर cowin.gov.in या वेबसाईटवर भरून त्यावरून येणा-या ओटीपी नुसार स्वत:ची नोंदणी करून घेऊन, लसीकरण सत्राची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकतात. त्याचप्रमाणे रिजव्हर्ड स्लॉटमध्ये ज्या लाभार्थ्यांना स्वत:हून नोंदणी करणे शक्य नाही असे लाभार्थी नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या बुथवर स्वत: जाऊन आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात. यावेळी बुथकरीता निश्चित केलेल्या क्षमतेनुसार लस देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -