घरनवी मुंबईऐन हंगामात स्ट्रॉबेरीला अवकाळी पावसाचा फटका

ऐन हंगामात स्ट्रॉबेरीला अवकाळी पावसाचा फटका

Subscribe

डिसेंबर महिन्यात लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात येतो. नाताळ सणात देशभरातून वाई, सातारा, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला मागणी वाढते.

डिसेंबर महिन्यात लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात येतो. नाताळ सणात देशभरातून वाई, सातारा, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला मागणी वाढते. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऐन हंगामात स्ट्रॉबेरीला फटका बसला असून शेतकर्‍यांनी खराब स्ट्रॉबेरी बांधावर फेकून दिल्याचे प्रकार महाबळेश्वर, पाचगणी भागात घडले आहे. यंदा स्ट्रॉबेरीच्या हंगामावर परिणाम झाला असून शेतकरी तसेच फळबाजारातील व्यापारीदेखील संकटात आले आहेत. वाशी येथील एमीएमसी बाजारामध्ये स्ट्रॉबेरी येत आहे. पण त्यामध्ये खराब झालेला माल असल्यामुळे स्ट्रॉबेरी खरेदी करताना सावधान रहा, असे मत ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे तसेच दाट धुक्यामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. एपीएमसीमध्ये डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू होते. स्ट्रॉबेरीचा पहिला बहर पूर्णपणे वाया गेला असून नाताळात स्ट्रॉबेरीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती विक्रेत्योकडून व्यक्त केली जात आहे. तसेच जो माल येत आहे. तो देखील खराब येत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीला प्रक्रिया उत्पादकांकडून मागणी वाढत आहे.

- Advertisement -

आइस्क्रीम, चॉकलेट, जॅम तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर केला जात आहे. स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रक्रिया उद्योगांकडून असणारी मागणी कमी झाली आहे. सध्या बाजारात एक किलो स्ट्रॉबेरीला प्रतवारीनुसार १०० ते ३०० रुपये दर मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीला मिळणारे दर अपेक्षेएवढे नाहीत. बाजारात आवक होणार्‍या स्ट्रॉबेरीची प्रतवारीही फारशी चांगली नाही. डिसेंबर महिन्यात दररोज दहा टन स्ट्रॉबेरीची आवक बाजारात होते. मात्र, अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी खराब झाली असून अपेक्षेएवढे दर मिळत नसल्याने शेतकरी तसेच व्यापारीही संकटात आले आहेत, असे व्यापांर्‍यानी म्हटले आहे.

हेही वाचा –

ST workers strike : एसटीच्या करोडोच्या जमीनी विकण्याचा अनिल परबांचा डाव – गोपिचंद पडळकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -