घरनवरात्रौत्सव 2022नवमीच्या दिवशी सिद्धिदात्रीला प्रसन्न करण्यासाठी करा 'या' मंत्राचे पठण

नवमीच्या दिवशी सिद्धिदात्रीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ मंत्राचे पठण

Subscribe

आज शारदीय नवरात्रीचा नववा म्हणजेच शेवटचा दिवस आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्री तिच्या साधकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तसेच त्यांना यश, बळ आणि धन सुद्धा प्रदान करते. शास्त्रामध्ये देवी सिद्धिदात्रीला सिद्धि आणि मोक्षाची देवी मानले जाते. देवी सिद्धिदात्री देवी महालक्ष्मी प्रमाणे कमळावर विराजमान असते. तिचे चार हात आहेत, त्यामध्ये शंख, गदा, कमळ आणि सूर्दशन चक्र आहे. देवी सिद्धिदात्रीला देवी सरस्वतीचे रूप देखील मानले जाते.

देवी सिद्धिदात्रीची पूजा कशी कराल?

- Advertisement -
  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ धारण करा.
  • त्यानंतर घर स्वच्छ करून घरातील पुजेच्या ठिकाणी एक चौरंग ठेवा.
  • त्यावर देवीची प्रतिमा स्वच्छ करून ठेवा आणि देवीला कुंकू, अधता, गंध, फुलं अर्पण करा.
  • देवी सिद्धिदात्रीला गोड आणि पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य अर्पण करा.
  • देवी सिद्धिदात्रीच्या सिद्धगन्‍धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि, सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी। या मंत्रांचे पठण करा आणि तिची आरती करा.

अशी मान्यता आहे की, देवी सिद्धिदात्रीला मोसंबी, चने, नारळ आणि हलवा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नवमीच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीला या गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास ती तुमच्यावर प्रसन्न होईल.


हेही वाचा :

देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महाअष्टमी किंवा महानवमीला कन्यापूजनदरम्यान द्या ‘ही’ भेटवस्तू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -