घरपालघरसूर्यफूल शेतीतून आदिवासी शेतकरी धरतोय आधुनिकतेची कास

सूर्यफूल शेतीतून आदिवासी शेतकरी धरतोय आधुनिकतेची कास

Subscribe

प्रत्येकी २०० रुपये किलोच्या हिशोबाने प्रत्येक शेतकर्‍याला प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाल्याने बायफकडून एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.

जव्हार: ग्रामीण भागातील शेतकरी अनेक शासकीय योजना ,सामाजिक संस्थांच्या विविध प्रकल्पद्वारे प्रगती साधू लागला आहे. तसेच आदिवासी शेतकर्‍यांचे शाश्वत जीवनमान उंचवण्यासाठी बायफ ही संस्था विविध पद्धतीने काम करत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे येथील प्रगतिशील शेतकर्‍यांनी आधुनिकतेची कास धरत सूर्यफूल लागवड करून आधुनिक शेतीतून आर्थिक हित जोपासत पर्यावरणाचे देखील रक्षण करण्याचे काम केले आहे. यामध्ये जव्हार,विक्रमगड,पालघर व डहाणू तालुक्यातील शेतकरी हा प्रयोग साधत आहेत. या करिता बायफकडून मोलाचे मार्गदर्शन लाभून शेतकर्‍यांना तीन महिन्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र बायफचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर अंमलबजावणी विनोद बोरसे, किरण भागडे, पंकज परदेशी, संतोष आगळे, नितीन भोये बायफ जव्हार टीम यांच्या मार्फत झाली. २०० शेतकर्‍यांना सात गुंठे जागेत ५०० ग्रॅम बियाणे देण्यात आले. तीन महिन्यात उत्पन्न येत प्रत्येकी ५० किलो ग्रॅम तेल बियांचे उत्पन्न निघाले.त्या तेल बियांतून प्रत्येक शेतकर्‍याने तेल काढल्यानंतर २५ किलो सुर्यफुलाचे तेल उत्पादित झाले.प्रत्येकी २०० रुपये किलोच्या हिशोबाने प्रत्येक शेतकर्‍याला प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाल्याने बायफकडून एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.

या प्रकल्पाचा एक उपक्रम म्हणून 200 हून अधिक शेतकर्‍यांंना प्रत्येकी सात गुंठ्यांकरिता 500 ग्रॅम बियाणे देऊन नियोजित मार्गदर्शन केले. त्यात तेल बिया जसे की सूर्य फुल,मोहरी, करडई, तीळ या सारख्या तेल बियांचे उत्पादन मुख्य वा मिश्र पिके, घेण्यास सुरुवात केली आहेत. भात कापणीनंतर शेतातील उरलेल्या ओलाव्यावर पिके घेण्यास मोठा वाव आहे. परिसंस्थेच्या -जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीकोनातून मोहरी, करडई आणि सूर्यफूल यांसारख्या तेल बिया, जमिनीत असलेल्या ओलाव्यावर पेरणी किंवा टोकण पद्धतीने, भाजीपाला पिकांमध्ये आंतरपीक म्हणून करत आहे. सूर्यफूल काढणीनंतर 35-40 टक्के तेल देते. प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी शेतकर्‍यांनी खूप रस दाखवून तेलबियांची काळजीपूर्वक लागवड केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे कीड नियंत्रणात आणि शेतातील फायदेशीर कीटक वाढण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकावर होणारा खर्च ही कमी होण्यास मदत होऊ शकते . यामुळे कुटुंबाला शेतीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते. पालघर ,जव्हार, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यातील शेतकरी या पद्धतीचा उपयोग करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -