घरपालघरजूचंद्र येथील चंडिका देवी मंदिरातही नवरात्रोत्सवाचा उत्साह 

जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिरातही नवरात्रोत्सवाचा उत्साह 

Subscribe

पांडव अज्ञात वासात गेले तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी देव देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्याच अज्ञातवासात प्रतिष्ठापना केलेले हे एक मंदिर असल्याची आख्यायिका आहे.

विरार : सोमवार पासून  शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. या नवरात्रोत्सवानिमित्ताने नायगाव पूर्व जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या चंडिका देवी मंदिरातही नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणीही भाविकांची रेलचेल सुरू झाली आहे. वसई तालुक्यातील नायगाव पूर्व विभागात जुचंद्रच्या गिरीशिखरावर वसलेले निसर्गरम्य परिसरात  आई चंडिका मातेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची रचना त्यामध्ये एका वर एक रचलेले दगड, शिळा, आणि दगडाच्या असलेल्या चौथऱ्यावर श्री चंडिका,  श्री कालिका, श्री महिषासुरमर्दिनी, श्री गणेश व दगडात कोरेलेल्या वाघाच्या प्रतिमा आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजेचे हे मंदिर प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. पांडव अज्ञात वासात गेले तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी देव देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्याच अज्ञातवासात प्रतिष्ठापना केलेले हे एक मंदिर असल्याची आख्यायिका आहे.

मंदिर खूपच जुने असून या मंदिराचे हळूहळू येथील ग्रामस्थांनी व चंडिका देवी न्यासाच्या वतीने नूतनीकरण केले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या मंदिराला तीर्थ क्षेत्राचा ही दर्जा मिळाला आहे. या मंदिरात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणच्या भागातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. या देवीच्या मंदिरात ही दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाचा  हा ६८ वा नवरात्रोत्सव आहे.  दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त हा उत्सव साजरा केला जात केला जात असल्याने विविध ठिकाणाहून भाविक भक्त दर्शनासाठी येऊ लागले आहेत.  या नऊ दिवसात मंदिरात धूप आरती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ, गरबा नृत्य  पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रम श्री चंडिका देवी न्यासातर्फे आयोजित करण्यात आले आहेत.तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चहापान, अन्नछत्र मध्ये भोजन अशी व्यवस्था केली जाते. डिजिटल दर्शन व्यवस्थेसाठी मंदिरात दूरदर्शन संच बसविण्यात आले आहेत. स्वच्छगृह, पार्किंग व्यवस्था, उद्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -