घरपालघरपालघर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी दिलीप खानंदे

पालघर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी दिलीप खानंदे

Subscribe

त्यानंतर त्यांनी सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता पदावर पनवेल, पेण, कल्याण, मुंब्रा, खेड, वसई व अमरावती अशा विविध ठिकाणी सेवा दिली.

पालघर:  महावितरणच्या पालघर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंतापदी दिलीप खानंदे हे नुकतेच रुजू झाले आहेत. यापूर्वी ते अमरावती मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकी या विषयात पदवी संपादन केल्यानंतर सन १९९२ मध्ये तत्कालीन राज्य वीज मंडळात कनिष्ठ अभियंता या पदावर रत्नागिरी येथे ते सेवेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता पदावर पनवेल, पेण, कल्याण, मुंब्रा, खेड, वसई व अमरावती अशा विविध ठिकाणी सेवा दिली.

सन २००५ मध्ये कल्याण येथे कार्यरत असताना महापुरामुळे कोलमडलेली वीज वितरण यंत्रणा २५ तासाच्या आत सुरळीत करण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. तर विविध ठिकाणी काम करताना त्यांनी वीजचोरीला प्रतिबंध व वीजहानी कमी करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.
अमरावती येथे कार्यरत असताना मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील १२ आदिवासी पाड्यांचे विद्युतीकरण त्यांनी केले. पालघर मंडळात ग्राहकाभिमुख वीज सेवेला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -