घर पालघर कंटेनरला लागलेल्या आगीत मारुतीच्या आठ कार जळाल्या

कंटेनरला लागलेल्या आगीत मारुतीच्या आठ कार जळाल्या

Subscribe

यामुळे कंटेनरचा चालक आणि क्लीनर यांनी ताबडतोब बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला.भर दुपारी कडक उन्हामुळे आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण कंटेनरला वेढा घातला.

डहाणू: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा येथे कंटेनरला लागलेल्या भीषण आगीत आतमधील आठ कार्सचा जळून कोळसा झाला.सदोष वायरींगमुळे शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा येथे दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एका कंटेंनरला भीषण आग लागली.हा कंटेनर हरीयाणायातील मानेसर येथून मारुती कंपनीच्या ८ बलेनो कार घेऊन जेएनपीटी बंदराकडे निघाला होता.कंटेनर दुपारच्या सुमारास मुंबई वाहिनीवरील चिंचपाडा येथे येताच केबिनच्या पुढील भागातून काळा धूर बाहेर येऊन अचानक आग लागली.यामुळे कंटेनरचा चालक आणि क्लीनर यांनी ताबडतोब बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला.भर दुपारी कडक उन्हामुळे आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण कंटेनरला वेढा घातला.

या आगीमुळे कंटेंनरसहीत आतमधील ८ कारचा जळून कोळसा झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले.डहाणूच्या अदानी पॉवर अग्निशमन दलाच्या बंबाने धुमसत असलेली आग विझविली. चिंचपाडा येथे कंटेंनरला आग लागल्याचे समजताच कासा पोलीस आणि महामार्ग पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मुंबई वाहिनीवरील वाहतूक बंद करून गुजरात वाहिनीवरून हळू हळू सुरू केली.यामुळे जवळपास दोन तास महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -