घरपालघरमुंबई -अहमदाबाद महामार्गावर अपघातात वाढ

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर अपघातात वाढ

Subscribe

मागील वर्षीच्या तुलनेत महामार्गावर अपघातात मृत्यूंची संख्या जवळपास तीन पटीने वाढली आहे.

प्राची किणी,विरार : वसई पूर्वेच्या भागातून जाणार्‍या मुंबई -अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात दीडशे अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५४ जण गंभीर जखमी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महामार्गावर अपघातात मृत्यूंची संख्या जवळपास तीन पटीने वाढली आहे.  अतिवेगाने वाहने चालविणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे, काही भागात रस्त्याची झालेली लेन कटिंग, मध्येच उभ्या केलेल्या वाहनांना धडका लागणे, अपुर्‍या दुभाजक, पथदिव्यांचा अभाव, पावसाळ्यात तयार झालेले खड्डे, अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अधूनमधून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. दहिसर टोल नाका ते विरार शीरसाड या चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीत २०२२ मध्ये दीडशे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर ५४ जण गंभीर जखमी झाले आहे. याआधी २०२१ मध्ये महामार्गावर १२० अपघात घडले होते. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८६ जण जखमी झाले होते. मृतांची आकडेवारी पहाता यंदाच्या वर्षी अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास तीन पटीने वाढले आहे. विशेषतः महामार्गावर २०२२ मध्ये घडलेल्या अपघातात अनेक अपघात हे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे घडले आहेत.

महामार्गावर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे रमलर, रेडियम,ब्लिकिंग सिग्नल, दिशादर्शक फलक, पाणी जाण्याचे मार्ग, संरक्षण जाळ्या अशा विविध समस्यांमुळे अपघाताच्या घटना घडत होत्या. यावर उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. तरीही प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले होते. उद्योगपती सायरस मेस्त्री यांचा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेनंतर प्राधिकरण खडबडून जागे झाले असून वर्षाअखेर विविध ठिकाणी उपाययोजना करण्याचे काम सुरू केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -