बोईसर: पालघर लोकसभा मतदारसंघासाठी जिजाऊ संघटेनेने आपला उमेदवार आज जाहिर केला. संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . उमेदवार म्हणून कल्पेश भावर यांचे नाव जाहिर करण्यात आले.
२०२४ च्या लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून “जिजाऊ संघटना ही पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहिर केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी भिवंडी, वासिंद, वाडा, पालघर, ठाणे, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केले होते.