घरठाणेठामपाच्या मतदान, पाणीपुरवठा चित्ररथास विशेष पुरस्कार

ठामपाच्या मतदान, पाणीपुरवठा चित्ररथास विशेष पुरस्कार

Subscribe

ठाणे । मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानाचा दिवस हा सुट्टी असल्याने बाहेर जाऊ नका, नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावावा अशी जनजागृती ठाण्यातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने ठाणे महापालिकेच्या मतदान आणि पाणीपुरवठा विभागास सरकारी सहभागासाठी विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व ठाणे महानगरपालिका यांच्या विद्यमाने काढण्यात येणार्‍या नववर्ष स्वागतयात्रेत महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त् आयुक्त् 2 प्रशांत रोडे, उपायुक्त् शंकर पाटोळे तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते. भारतीय नववर्षे स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवडणूकीची जनजागृती करणारा चित्ररथ, पाण्याची बचत करा, पाणी जपून वापरा, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा अशी जनजागृती करणारा पाणीपुरवठा विभागाचा चित्ररथ, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच परिवहन सेवेचा वापर करा, असा संदेश देणारा परिवहनचा चित्ररथ आणि झाडे लावा, झाडे आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देणारा पर्यावरण व प्रदुषण विभागाचा संयुक्त चित्ररथ सहभागी करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -