घरपालघरMofa Act News: विकासकांवर मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Mofa Act News: विकासकांवर मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Subscribe

त्यांनी सोसायटीची नोंदणी झाल्यानंतर नियमानुसार चार महिन्यांच्या आत इमारत व आराखडा मंजूर असलेली जमीन ही सोसायटीच्या नावावर हस्तांतरीत करून कन्व्हेअन्स करुन देणे आवश्यक होते.

भाईंदर :- मीरारोडमधील शीतल नगर परिसरातील मनोर सोसायटीतील शीतल रेंजन्सी सी विंग या इमारतीची सोसायटी स्थापन होऊन अनेक वर्ष झालेली असतानाही त्यांनी ती जमीन सोसायटीच्या नावे चार महिन्यांच्या आत कन्व्हेअन्स करून दिली नसल्याने एस.एस. डेव्हलपर्स यांच्या दोन भागीदारांवर मोफा कायद्याच्या अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरारोडमधील शीतल नगरमधील शीतल रेंजन्सी येथील एस.एस. डेव्हलपर्स चंदुभाई पटेल व एस.सी. पटेल पार्टनर व प्रोमोटर्स यांनी बांधलेली असून ती त्यांनी विकसित केली आहे. त्यांनी सोसायटीची नोंदणी झाल्यानंतर नियमानुसार चार महिन्यांच्या आत इमारत व आराखडा मंजूर असलेली जमीन ही सोसायटीच्या नावावर हस्तांतरीत करून कन्व्हेअन्स करुन देणे आवश्यक होते.

परंतु, त्यांनी अद्यापपर्यंत सदर जमीन सोसायटीच्या नावावर हस्तांतरीत करुन कन्व्हेन्स डिड करुन दिली नाही.त्यामुळे दोन्हीही विकासकांच्या विरोधात महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका बांधण्यास प्रोत्साहन देणे, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत अधिनियम, १९६३ चे कलम ११ व कलम १३ नुसार मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदरील गुन्ह्यात तक्राररदार सलमान कुरेशी यांच्या अर्जाची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी करुन चौकशीअंती तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. तर सदरील गुन्हाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण बोडके हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -