घरपालघरमोगरा घटलाss,गारठवणार्‍या थंडीत महागही झालाss

मोगरा घटलाss,गारठवणार्‍या थंडीत महागही झालाss

Subscribe

सध्या मोगरा प्रती किलो तीनशे रुपयेहून अधिकच्या दराने विकला जाऊ लागला आहे.

विक्रमगड : कडाक्याच्या थंडीने मोगरा पिकावर विपरित परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. उत्पन्न कमी आणि मागणी वाढल्याने मोगऱा तीनशे रुपये प्रती किलोहून अधिक दराने विकला जाऊ लागला आहे.विक्रमगड तालुका हा निसर्गरम्य व हवामानाच्या दृष्टीने पिकासाठी उत्तम मानला जातो. याठिकाणी सुपीक असल्याने शेतकरी पावसाळ्यात भात तर उन्हाळ्यात कलिंगड,काकडी,भेंडी,चवळी,मिरची आदी पिके घेतात. भाजीपाल्यासह आता शेतकरी फुलशेतीकडेही वळू लागला आहे. फुलशेतीत विक्रमगड तालुक्यात प्रामुख्याने मोगरा फुलाची शेती अधिक प्रमाणात केली जाते.यंदा कडाक्याची थंडी असल्याने मोगर्‍याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटले आहे. त्यातच मागणीही वाढली आहे. त्यामुळे मोगर्‍याचा दरही कडाडला आहे. सध्या मोगरा प्रती किलो तीनशे रुपयेहून अधिकच्या दराने विकला जाऊ लागला आहे. एक एकर जमिनीमध्ये लागवड केलेला मोगरा कळी तोडण्याकरता पाच ते सहा लोक पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंतत जवळ जवळ 8 ते 10 किलो मोगरा कळीची तोड करतात. मोगर्‍याला स्थानिक पातळीवर बाजार नाही. त्यामुळे येथील शेतकरी एकत्र येऊन मोगरा कळी मुंबईच्या बाजारात पाठवतात. त्यासाठी काही दलालही आता विक्रमगडमध्ये येऊ लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -