घरपालघरन्यू पालघर नाही साहेब,नवीन पालघर

न्यू पालघर नाही साहेब,नवीन पालघर

Subscribe

चेअरमन व डीएफसीसीचे चेअरमन यांच्याकडे ’न्यू पालघर’ स्टेशन ऐवजी मराठीत ’नवीन पालघर’ रेल्वे स्टेशन नाव द्यावे अशी मागणी केली आहे.

पालघर, डीएफसीसीचे काम संपत आले आहे. बोईसर रेल्वे स्टेशन व वाणगाव रेल्वे स्टेशन यांदरम्यान न्यू पालघर रेल्वे स्टेशन निर्माण होणार आहे. नवीन रेल्वे स्थानक महाराष्ट्रात असल्याने मराठी नावे देण्यात यावी, म्हणून शिवसेना प्रवक्ते केदार काळे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन व डीएफसीसीचे चेअरमन यांच्याकडे ’न्यू पालघर’ स्टेशन ऐवजी मराठीत ’नवीन पालघर’ रेल्वे स्टेशन नाव द्यावे अशी मागणी केली आहे.

मालवाहतुकीसाठी पश्चिम रेल्वेवरील बोईसर रेल्वे स्टेशन व वानगाव रेल्वे स्टेशन यामध्ये एक नवीन रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे. डीएफसीसीने नाव “न्यू पालघर रेल्वे स्टेशन” असे ठेवले आहे. परंतु हे स्थानक महाराष्ट्रात असल्यामुळे या रेल्वे स्थानकाची मराठीत नावं द्यावीत, अशी मागणी आहे. म्हणून या रेल्वे स्टेशनचे नाव “नवीन पालघर रेल्वे स्थानक” असे ठेवल्यास स्थानिक भूमीपुत्राला आनंद होईल. स्थानिक भूमीपुत्राने या प्रकल्पासाठी जागा दिली आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य केले आहे,असे काळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

“न्यू” हा इंग्रजी शब्द आहे त्याऐवजी त्याला पर्यायी “नवीन” हा मराठी शब्द आहे. म्हणून या होणार्‍या नवीन रेल्वे स्थानकाचे नाव “नवीन पालघर रेल्वे स्थानक” असे ठेवावे अशी मागणी शिवसेना प्रवक्ते केदार काळे यांच्याकडून करण्यात आली आहे. या विषयासाठी त्यांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमन व डीएफसीसीच्या चेअरमन यांना मेल ही केला आहे आणि स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांकडेही या विषयाचा पाठपुरावा करणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवून या विषयात पाठपुरावा करावा अशी विनंती करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -