घरपालघरबोगस डॉक्टर शोध समित्यांचे ऑपरेशन निष्क्रिय

बोगस डॉक्टर शोध समित्यांचे ऑपरेशन निष्क्रिय

Subscribe

अशावेळी जिल्ह्यात बोगस डॉक्टर नसल्याचे समितीच्या सदस्यांकडून बैठकीदरम्यान युक्तिवाद करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालघर : गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात बोगस डॉक्टर शोध समिती असून अशा समिती निष्क्रिय असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुपोषण, बालमृत्यू व इतर आजारांमुळे मृत्यू होण्यास कारणीभूत ठरत असून बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सक्रिय झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी मोखाडा पंचायत समितीच्या लगत २६ वर्षांपासून कार्यरत असणार्‍या एका बोगस डॉक्टराच्या दवाखान्यावर छापा टाकून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध सदस्यांकडून बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई होत नसल्याबाबत अनेकदा चर्चा झाली असताना त्यांच्याविरुद्ध स्थानिक पातळीवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे. बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीमार्फत दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जात असतो. अशावेळी जिल्ह्यात बोगस डॉक्टर नसल्याचे समितीच्या सदस्यांकडून बैठकीदरम्यान युक्तिवाद करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisement -

मोखाडा पंचायत समिती कार्यालयालगत आनंदा मलिक या नॅचरोपॅथी पदविका वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या इसमांकडून गेल्या २६ वर्षांपासून दवाखाना चालवत असल्याची माहिती मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर व बोगस डॉक्टर शोध समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी यांनी त्याठिकाणी भेट दिली असता एका रुग्णाला सलाईन लावल्याचे आढळून आले. तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍलोपॅथिक औषधांचा साठा असल्याचे यावेळी दिसून आले. बोगस डॉक्टरविरोधात मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व वैद्यकीय व्यवहार अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पालघर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरविरुद्ध मोहीम हाती घेणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -