घरपालघरवसई-विरार महापालिकेत तेलगोटे पॉवर

वसई-विरार महापालिकेत तेलगोटे पॉवर

Subscribe

शुक्रवारी तेलगोटे यांच्यावर पाणी पुरवठ्यासह अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे आदेश महापालिकेच्या मुख्यालयातून जारी झाले.

वसईः अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याच्या अनेक तक्रारी असलेल्या वालीव प्रभाग समितीमधील अतिक्रमण विभागाचे लिपिक सुनील तेलगोटे यांची आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पाणी पुरवठा विभागात बदली केली होती. मात्र, अवघ्या दोनच महिन्यांत तेलगोटे यांना पुन्हा त्याच पदावर आणण्याची वेळ आयुक्तांवर का आली याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरु आहेत.यावरून तेलगोटे यांच्या ताकदीची कल्पना आयुक्तांना आल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक निलेश जाधव यांच्यावरही आणखी एका प्रभागाच्या आरोग्य निरीक्षकपदाचा कार्यभार दिल्याने जाधवही महापालिकेतील ताकदवान अधिकारी असल्याचे दिसून आले आहे.

वालीव प्रभाग समिती परिसर अनधिकृत बांधकामाचे माहेरघर मानले जाते. या परिसरातील अनधिकृत बांधकांमांना प्रशासनासह स्थानिक सत्ताधारी, विरोधक, ठाण्यातील बडे नेते, काही मंत्र्यांसह मंत्रालयातील अधिकार्‍यांचाही वरदहस्त असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होत आली आहे. दवे, ठाकूर नावाचे इसम अनधिकृत बांधकाम करणार्‍या भूमाफियांचे एजंट म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच माध्यमातून ही साखळी कार्यरत आहे. यासाखळीला मॅनेज करण्याचे काम लिपिक तेलगोटे यांच्यावर होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून तेलगोटे वालीव प्रभाग समितीत तेही अतिक्रमण विभागात ठाण मांडून बसले होते. दोन महिन्यांपूर्वी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी याबड्यांचे वरदहस्त लाभलेल्या सुनील तेलगोटे यांची बदली केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आयुक्तांचा हिंमतीचे त्यावेळी कौतुकही झाले होते. पण, हा धक्का फार काळ टिकला नाही. शुक्रवारी तेलगोटे यांच्यावर पाणी पुरवठ्यासह अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे आदेश महापालिकेच्या मुख्यालयातून जारी झाले.

- Advertisement -

 

जाधवांची देखील वर्चस्व

- Advertisement -

दरम्यान, निलेश जाधव या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचे वर्चस्वही नव्या बदल्यांच्या यादीतून दिसून आले आहे. प्रभाग समिती बोळींजच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाची जबाबदारी सांभाळत असलेल्या जाधव यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. आता नव्या बदलीच्या आदेशात सध्याचा कार्यभार सांभाळून प्रभाग समिती बच्या आरोग्य निरीक्षकपदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यातून जाधव महापालिकेतील ताकदवान अधिकारी असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -