घरपालघरBhayander toilet news : मीरा- भाईंदरमधील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था

Bhayander toilet news : मीरा- भाईंदरमधील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था

Subscribe

परंतु, या ठेकेदाराने मनपाच्या अटी शर्तीचे उल्लंघन करत कामगारांच्या पगारावरच डल्ला मारला,अशा तक्रारी होत्या.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालये बनवली आहेत. महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने शौचालयाची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मीरा- भाईंदर महापालिकेने शहरातील झोपडपट्टी परिसराची स्वच्छता राखण्यासाठी व नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास २०० पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालये बनवण्यात आली आहेत. या शौचालयाची दैनंदिन स्वछता, देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेकडून खासगी ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता. परंतु, या ठेकेदाराने मनपाच्या अटी शर्तीचे उल्लंघन करत कामगारांच्या पगारावरच डल्ला मारला,अशा तक्रारी होत्या.

कामगारांना कमी वेतन देऊन त्यांच्याकडून काम करून घेत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे महापालिकेने ठेकेदाराला दिलेला ठेका रद्द केला आहे. परंतु, हा ठेका रद्द करण्यापूर्वी पुढील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. पर्यायी व्यवस्था न करता ठेका रद्द केल्याने शौचालयाच्या वर बनवलेल्या खोलीत राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या मदतीने साफ सफाई करून घेतली जात आहे. परंतु हे कर्मचारी अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने काम करत नसल्याने शौचालये अस्वच्छ व नादुरुस्त झाली आहेत. शहरात अनेक ठिकाणी शौचालयाची दरवाजे तुटले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे नळ लाईटची व्यवस्था देखील नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छ शौचालयांचा वापर करावा लागत आहे. शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईंदर पश्चिमेच्या जय अंबे नगर परिसरातील शौचालयांची स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍याने तुटलेल्या दरवाजांच्या जागी चक्क प्लास्टिक व पोत्याचे पडदे लावले आहेत. त्या ठिकाणी पुरुष व महिलांसाठीच्या दोन शौचालयांचा समावेश आहे. हा झोपडपट्टीचा परिसर असल्यामुळे सार्वजनिक शौचालयां व्यतिरिक्त तेथे दुसरी पर्यायी सुविधा नाही.

- Advertisement -

 

सार्वजनिक शौचालयाचे तुटलेले दरवाजे व देखभाल दुरुस्ती संदर्भातील तक्रार मिळाली आहे. दरवाजांची देखभाल-दुरुस्ती व साफ सफाई करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहे. सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात येईल.

- Advertisement -

– संजय काटकर , आयुक्त, मीरा- भाईंदर महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -