घरपालघरराष्ट्रीय उद्यानातून येणार्‍या पावसाच्या पाण्याचा असा होणार निचरा

राष्ट्रीय उद्यानातून येणार्‍या पावसाच्या पाण्याचा असा होणार निचरा

Subscribe

सदरील काम अत्यंत जिकरीचे होते. वरून महामार्ग २४ तास सुरू असतानाही त्याखालून पुशिंग करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वारंवार अधिकार्‍यांना सदरील कामावर लक्ष ठेवून सतत पाहणी करावी लागत होती.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून निघणारे पावसाचे पाणी शहरात घुसून सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण जास्त होत होते. आता त्यावर उपाय म्हणून मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या खालून वरसोवा व सगणाई माता मंदिर येथे दोन ठिकाणी दोन मीटर व्यासाचे दोन-दोन पाईप टाकून त्याठिकाणी उघड्या बनवून थेट वर्सोवा मार्गे घोडबंदर खाडीत आणि दुसरा घोडबंदर येथील जे.पी. इमारत मार्गे ते सुद्धा घोडबंदर खाडीत हे पाणी सोडले जाणार आहे. तर याठिकाणी दोन्ही कामांत मिळून पाच कोटींचा खर्च आला आहे. सदरील काम अत्यंत जिकरीचे होते. वरून महामार्ग २४ तास सुरू असतानाही त्याखालून पुशिंग करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वारंवार अधिकार्‍यांना सदरील कामावर लक्ष ठेवून सतत पाहणी करावी लागत होती.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. काशीमीरा परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येते. यामुळे दरवर्षी परिसरात पावसाचे पाणी जाऊन ग्रीन व्हिलेज, मीनाक्षी नगर, वेस्टर्न पार्क, लक्ष्मी बाग, मीरा- गावठाण या भागात लोकवस्तीमध्ये नागरिकांचे नुकसान होत आहे. या भागातील पावसाचे पाणी जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर उघाडी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या लहान असून लोकवस्ती व पाण्याचा जोर यामुळे त्यातून पाण्याचा कमी प्रमाणात निचरा होत असतो. त्यामुळे या भागात पाणी जमा होऊन परिसर जलमय होतो. त्यात जनतेचे आर्थिक नुकसान सह लोकांच्या जीव जाण्याच्या घटनाही घडत असतात.

- Advertisement -

मुंबई- अहमदाबाद महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडून परवानगीसाठी मुद्दामहून वेळ लावला जात आहे. गेल्या वर्षी २७ जून रोजी परवानगी दिली. तर दुसरीकडे मुख्य रस्त्यात विनापरवानगी बोरिंग व सुशोभिकरण अशा बेकायदा कामांना मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अभय दिला आहे. त्यांच्यावर कारवाई न-करता त्यांनी मुख्य रस्त्यात मारलेल्या बोअरिंगमधून लाखो लिटर पाणी चोरी होत असतानाही भूजल सर्व्हेक्षण विभाग व महसूल विभाग यांनीही बघ्याची भूमिका घेतलेली आहे.

 

- Advertisement -

एकीकडे राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वाहतूक सुरू होती .तर दुसरीकडे पाण्याचा निचरा करण्यासाठी हे काम अत्यंत गरजेचे व जिकरीचे होते. त्यामुळे सदरील काम करण्यासाठी अत्यंत जिकरीने काम पूर्ण होत असून यामुळे पावसाळ्यात जनतेचा होणारा आर्थिक नुकसानही होणार नाही व पाणी तुंबणार नाही .

-दिपक खांबीत, शहर अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -