श्रद्धाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर

आफताबने तिला इतकी मारहाण केली, की ती बेडवरून उठूही शकत नाही, असे तिने मित्रासोबत केलेल्या चॅटमध्ये म्हटले होते.

shraddha walkar murder case why aftab amin poonawalla killed his live in partner sharaddha delhi police disclose

वसई : आफताबच्या अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहे. तो श्रद्धाला मारहाण तर करायचाच, शिवाय तिचा मानसिक छळही करत होता. त्याने श्रध्दाला केलेल्या मारहाणीचे काही फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता श्रद्धाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहेत. या चॅटमध्ये श्रद्धा एका मित्राशी बोलत असून आफताबच्या क्रूरतेचाही उल्लेख तिने या चॅटमध्ये केला आहे. चॅटमध्ये श्रद्धाने तिच्यासोबत होणार्‍या मारहाणीबद्दल सांगितले होते. या चॅटमध्ये श्रद्धाने असे म्हटले होते, की आफताब आता लवकरच त्याच्या घरी जाणार आहे. आफताबने तिला इतकी मारहाण केली, की ती बेडवरून उठूही शकत नाही, असे तिने मित्रासोबत केलेल्या चॅटमध्ये म्हटले होते. काल त्याच्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर सर्व काही ठीक झाले, आज तो जात आहे, पण मी आज जात नाहीये. कारण त्याने मला अतिशय वाईटरित्या मारहाण केली आहे. माझे बीपी लो झाले आहे आणि माझ्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत. बेडमधून उठण्याएवढीही ताकद नाहीये,असे श्रद्धाने म्हटले आहे.श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात दररोज अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर शरीराचे काही तुकडे आणि डोके त्याने पाच महिन्यांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवले होते. तर काही तुकडे हत्या केल्यानंतर महिन्याभरात शहरातील विविध ठिकाणी फेकले. आता पोलिसांकडून या शरीराच्या तुकड्यांचा शोध सुरू आहे. काही तुकडे मिळाले असून श्रद्धाचे डोके मात्र अजून सापडलेले नाही.