घरपालघरवनविभागाच्या जागेतील झाडांची कत्तल

वनविभागाच्या जागेतील झाडांची कत्तल

Subscribe

नुकताच कुडे गावच्या हद्दीतील राखीव वनाच्या जागेतील आठ ते दहा स्थानिक प्रजातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.राखीव वन असलेले भूखंड बळकाण्यासाठी भूमाफिया कार्यरत आहेत.

मनोर : मुंबई- अहमदाबाद महामार्गालगतच्या वनविभागाच्या आणि आदिवासींच्या मोक्याच्या जमिनींवर भूमाफियांनी अतिक्रमण करून केलेली बांधकामे हटवण्यासाठी महसूल पुढाकार घेत असताना वनविभागाचे कर्मचारी राखीव वनाच्या जागेत अतिक्रमण करण्यासाठी सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कुडे वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केला आहे.नुकताच कुडे गावच्या हद्दीतील राखीव वनाच्या जागेतील आठ ते दहा स्थानिक प्रजातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.राखीव वन असलेले भूखंड बळकाण्यासाठी भूमाफिया कार्यरत आहेत.

दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कुडे गावाच्या हद्दीतील महामार्गालगतच्या वनविभागाच्या मालकीच्या जागेतील आठ ते दहा झाडांची बुधवारी रात्री कत्तल करण्यात आली आहे.कत्तल केलेल्या झाडांची खोडे दिसू नये यासाठी झाडांची पाने टाकून खोडे झाकून ठेवण्यात आली होती.जंगलांचा र्‍हास सुरू असताना झाडांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले वन विभागाचे कर्मचारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत कुडे राउंडचे वनरक्षक आणि वनपाल वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून भूमाफियांना मोकळे रान देत असल्याचा आरोप समितीचे सदस्य बाबुराव भोवर यांनी केला आहे.झाडांच्या कत्तली प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कुडे राउंडचे वनपाल कोंडोराम शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -