घरपालघरजि.प. अध्यक्ष,पं.स. सभापती आरक्षण जाहीर

जि.प. अध्यक्ष,पं.स. सभापती आरक्षण जाहीर

Subscribe

याप्रमाणे पंचायत समिती डहाणू, मोखाडा व विक्रमगड या अनुसूचित जमातीसाठी तर वाडा, जव्हार व तलासरी ह्या पंचायत समिती सभापती अनुसूचित जमाती (महिला) असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या ८ पंचायत समित्यांसाठी अध्यक्ष व सभापती पदाचे आरक्षण सोडत आज २/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन पालघर येथे उपजिल्हाधिकारी (सा) संजीव जाधवर जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सोडतीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले असून यामध्ये ४ ऑक्टोबर २०२२ च्या अधिसूचनेप्रमाणे पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येत असलेल्या डहाणू, तलासरी वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडा या सहा तालुक्यांत मागील वेळी असलेले आरक्षण लक्षात घेता आता पडलेले अनुसूचित जमाती महिला व अनुसूचित जमाती हे आरक्षण चक्राणुुक्रमे फिरवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा) जाधवर यांनी सांगितले.
याप्रमाणे पंचायत समिती डहाणू, मोखाडा व विक्रमगड या अनुसूचित जमातीसाठी तर वाडा, जव्हार व तलासरी ह्या पंचायत समिती सभापती अनुसूचित जमाती (महिला) असे आरक्षण जाहीर करण्यात आले. तर पालघर वसई पंचायत समिती सभापती पदासाठी चिठ्ठ्या काढून सर्वसाधारण व अनुसूचित जमाती जाहीर करून यामध्ये वसई हे सर्वसाधारण तर पालघर पंचायत समिती सभापती म्हणून अनुसूचित जमाती आरक्षण जाहीर करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -