Ekadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर

ashadi ekadashi 2021 puja at prati pandharpur wadala vitthal mandir mumbai
Ekadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशीत वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. यात पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशकते सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र हा सोहळा मुंबईतही कोरोनाचे नियम पाळत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतील प्रति पंढपूर या नावाने ओळखे जाणाऱ्या विठ्ठल मंदिर परिसर विठू नामाच्या गजराने हरवून गेला आहे.