घरमनोरंजनमहिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन 'अनुराधा' सिरीजचा पोस्टर पाहून रुपाली चाकणकर भडकल्या

महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन ‘अनुराधा’ सिरीजचा पोस्टर पाहून रुपाली चाकणकर भडकल्या

Subscribe

सोशल मीडियाचा(Social Media) पुरेपूर वापर सर्व सेलिब्रिटी प्रमोशन करण्यासाठी करत आहेत. दरम्यान, सोशल मीडिया मार्केटींग करण्यासाठी तगडं प्लॅटफॉर्म मानलं जातं. काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक मराठमोळ्या अभिनेत्री “मी लिपस्टीकचे समर्थन करत नाही बॅन लिपस्टीक” असा संदेश देत होत्या. मात्र अवघ्या काही दिवसात याचा उलगडा झाला. ‘अनुराधा'(Anuradha) या सिरीजच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रींनी हा घाट घातला असल्याचं समोर आलं. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही 7 भागांची वेब सिरीज असून सिरीजमध्ये भलीमोठी स्टारकास्ट आहे. सिरीजच्या जाहिरातीद्वारे चुकीचा संदेश जात असल्याचं ट्विट करत राज्याच्या महिला आयोग उपाध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी आक्षेप नोंदवला आहे.( Rupali chakankar file complaint against anuradha web series)

रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत पत्र लिहित तक्रार दाखल केली आहे. पत्रामध्ये त्या म्हणाल्या, एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. या सिरीजमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत असल्याची तक्रार रुपाली चाकणकरांनी केली आहे. तसेच याबाबत दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली आहे.

- Advertisement -

‘अनुराधा’ वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचा बोल्ड अंदाज दिसून येतोय तसेच तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा देखील टिजरच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र यामागचे नेमकं रहस्य काय आहे याचा उलगडा करण्यात आला नाहीये. प्रेक्षकांच्या टिजरला संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत मात्र आता रुपाली चाकणकर यांनी लिहलेल्या पत्रामुळे वेब सिरीजला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –  Hardik Pandya:हार्दिक पांड्या आणि नताशा पुन्हा देणार गुडन्यूज ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -