Pitru Paksha 2021 : सर्वपित्री अमावस्येमुळे मुंबईतील बाणगंगा तलावावर गर्दी

Pitru Paksha 2021 Hindu devotees perform Pitru Paksha at Banganga in Walkeshwar
Pitru Paksha 2021 : पितृपक्षानिमित्त मुंबईतील बाणगंगा सरोवर लोकांची गर्दी

आज पितृपक्षातील अखेरचा दिवस आहे. या दिवसाला सर्वपित्री अमावस्या असे म्हटले जाते. या महिन्यातील १५ दिवस पूर्वजांचे स्मरण करुन त्यांच्या नावाने श्राद्ध विधी केले जातात. ज्यांची तिथी माहीत नसते अशांचे श्राद्ध या दिवशी घातले जाते. शास्त्रात या दिवसाला खास असे महत्त्व आहे. याच सर्वपित्री अमावस्येनिमित्ताने आज मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील पुरातन बानगंगा तलावावर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी आपल्या पूर्वजांचे स्मरण करु त्यांच्या नावाने विधीवत श्राद्ध कार्य करण्यात आले.