Photo : श्रिया पिळगावकरचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटीफुल लूक

मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांची एकुलती एक लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने आत्तापर्यंत बऱ्याच वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. श्रियाने 2016 मध्ये शाहरुखच्या फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.त्यानंतर तिने बरेच चित्रपट, वेवसीरिजमध्ये काम केले. श्रियाने ‘ताजा खबर’, ‘गिल्टी माइंड्स’,’द ब्रोकन न्यूज’,’मिर्जापुर’ यांसारख्या बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे. श्रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.