दाऊदने पुन्हा केला निकाह; घरचा पत्ताही बदलला

दाऊदने दुसरा विवाह केला आहे. त्याची दुसरी पत्नी पठाण आहे. मात्र त्याने पहिली पत्नी मेहजबानला तलाख दिलेला नाही. मी गेल्या वर्षी मेहजबानला दुबई येथे भेटलो होतो, असेही अलिशाहने एएनआयला सांगितले आहे. दाऊदच्या दुसऱ्या विवाहाची माहिती त्याच्या भाच्यानेच दिल्याने ती खरी मानली जात आहे.

NIA action on d company 25 lakh bounty on don dawood ibrahim and 20 lakh chota shakeel underworld

नवी दिल्लीः ६७ वर्षीय अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने दुसरा विवाह केला आहे. मात्र त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. तसेच त्याने घरचा पत्ताही बदलला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एएनआय) दाऊदची बहिण हसीना पारकर हिचा मुलगा अलिशाहची चौकशी केली. या चौकशीत दाऊदच्या दुसऱ्या निकाहची माहिती समोर आली आहे. दाऊदने त्याच्या घरचा पत्ता बदलला आहे. आता तो कराची येथील संरक्षण विभागाच्या क्षेत्रात वास्तव्य करत आहे. तेथील अब्दुला गाझी बाबा दर्गाजवळ त्याचे नवीन घर आहे, अशी माहिती अलिशाहने एएनआयला दिली आहे.

दाऊदने दुसरा विवाह केला आहे. त्याची दुसरी पत्नी पठाण आहे. मात्र त्याने पहिली पत्नी मेहजबानला तलाख दिलेला नाही. मी गेल्या वर्षी मेहजबानला दुबई येथे भेटलो होतो, असेही अलिशाहने एएनआयला सांगितले आहे. दाऊदच्या दुसऱ्या विवाहाची माहिती त्याच्या भाच्यानेच दिल्याने ती खरी मानली जात आहे.

गेल्या वर्षी एनआयएने डी गँगविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. डी गँगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याच्या आरोपाखाली एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले.

एनआयएने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच दाऊदसह आणखी काही जणांना फरार घोषित केले आहे. डी गँगमार्फत श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळत ते पैसे दहशतवादासाठी वापरले जायचे. अटक केलेल्या तीनही आरोपींना हवाल्यामार्फत हे पैसे पुरवते जात होते. हवाल्यामार्फत मिळालेल्या पैशांचा वापर ते मुंबईत दहशवतवादी हल्ला करण्यासाठी करणार होते, अशी माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार एनआयएने ही कारवाई केली आहे.

डी गँगशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही अटकेत आहेत. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात या दोघांसह दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा समावेश केला आहे. सलीम फ्रुट हा डी गँग आणि छोटा शकीलच्या नावाने धमकी देत खंडणी उकळत होता. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने सलीम फ्रुटविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सलीम फ्रुटला अटक करण्यात आली. सलीम फ्रुटने संबंधित व्यावसायिकाला धमकावत त्याच्याकडून महागडी रेंज रोव्हर गाडी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.