घरमहाराष्ट्रदावोस आता जाता रहेगा, आधी महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प आणा; संजय राऊतांचा घणाघात

दावोस आता जाता रहेगा, आधी महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प आणा; संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

Sanjay Raut on Davos Investment | आधी महाराष्ट्रातून राज्याबाहेर गेलेल प्रकल्प राज्यात पुन्हा आणा असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

Sanjay Raut on Davos Investment | मुंबई  –  स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. या परिषदेमार्फत महाराष्ट्रात १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक आणणार असल्याचा दावा केला जातोय. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आधी महाराष्ट्रातून राज्याबाहेर गेलेल प्रकल्प राज्यात पुन्हा आणा असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – दावोसमध्ये पहिल्याच दिवशी मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक, ‘या’ पाच कंपन्या येणार महाराष्ट्रात

- Advertisement -

राज्यात १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक खरोखर येणार असले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. पण खरोखरच एवढी गुंतवणूक येणार आहे का? असा सवाल करत महाराष्ट्रात अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, ती आमच्या डोळ्यांसमोरून निघून गेली. ती परत आणण्यासाठी ना मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, ना उपमुख्यमंत्र्यांनी केले आणि नाही उद्योगमंत्र्यांनी केले, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

दावोसला जागतिक जत्रा भरते. तिथून ते सव्वालाख कोटींची गुंतवणूक आणणार आहेत. ही गुंतवणूक खरंच महाराष्ट्रात आली की आम्ही मत व्यक्त करू. दावोस येत जात राहील, आधी महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प आणा, असं थेट आव्हानच राऊतांनी आज शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.

- Advertisement -


शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा

दरम्यान, आज निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने मागच्या काळात जे निर्णय दिले त्यावरून समजतंय की काय होतंय? शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी होत नाही. शिवसेना एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखील जी आहे तीच खरी शिवसेना आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – ठाकरेंचे पक्षप्रमुखपद जाणार की राहणार? आज शिवसेना आणि पक्षचिन्हावर सुनावणी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -