काळ्या कपड्यात कियारा निघाली सासरला, नेटकरी वैतागले

नव्यानेच लग्न झालेले हे जोडपे ट्रेडीशनल लुकमध्ये असणे अपेक्षित होते. पण सिद्धार्थ आणि कियाराने नॉर्मल कॅज्युअल लुक मध्ये दिसले. तसेच कियाराने काळ्या रंगाचे कपडे घातलेले. हे पाहून नेटकरी वैतागले

बॉलिवूड मधलं सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा काल (7 फेब्रुवारी) रोजी अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आज हे नवदाम्पत्य राजस्थान वरून परतल. दिल्ली विमानतळावर या दोघांना पाहताच चाहत्यांना सुखद धक्का बसला. मात्र यावेळी कियाराने घातलेल्या काळ्या कपड्यांमुळे नेटकरी चांगलेच वैतागले आहेत.

दिल्ली विमानतळावर या दोघे दिसताच सगळ्यांचेच लक्ष त्यांच्या कपड्याकडे गेले. नव्यानेच लग्न झालेले हे जोडपे ट्रेडीशनल लुकमध्ये असणे अपेक्षित होते. पण सिद्धार्थ आणि कियाराने नॉर्मल कॅज्युअल लुक मध्ये दिसले. तसेच कियाराने काळ्या रंगाचे कपडे घातलेले. हे पाहून नेटकरी वैतागले आणि त्यांनी या दोघांना ट्रेल करण्यास सुरुवात केली आहे.

सिड-कियारा यांच रिसे्पशन मुंबईला होणार आहे. यासाठी नवीन जोडप्यानंसह त्यांचे पूर्ण कुटुंब हे दिल्ली विमानतळावर पाहायला मिळाले. सर्वजण खूप खुश असल्याचे पाहायला मिळाले.

यावर,नेटकऱ्यांचे म्हणणे असे होते की, सुंदर नवीन वधू-वर हे छान कपड्यात दिसायला हवे होते. परंतु हे दोघे जण अगदी साध्या वेशभूषेत दिसून आले. हे पाहून नेटकरी प्रचंड वैतागले. हे पाहून सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.