घरताज्या घडामोडीकसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मनसेची वेट अॅण्ड वॉच भूमिका

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मनसेची वेट अॅण्ड वॉच भूमिका

Subscribe

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपा व महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार याबाबत सर्वांनाच उस्तुकता होती. अशातच मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपा व महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार याबाबत सर्वांनाच उस्तुकता होती. अशातच मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश मिळेपर्यंत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नये, असे आदेश मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना व मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसे तटस्थ राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (kasba chinchwad by election mns roll mns support pune maharashtra)

पुण्यातील कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून सर्वपक्षियांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.

- Advertisement -

कसबा पोटनिवडणुकीत भाजपाने टिळक कुटुंबाला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने कसबा मतदारसंघामधून रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच, कसब्यातून रवींद्र धंगेकर आणि रासने यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

- Advertisement -

चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विठ्ठल कृष्णाजी काटे व शिवसेनेचे बंडखोर राहूल तानाजी कलाटे यांच्यात ही लढत होणार आहे.


हेही वाचा – “शिवसेनेला कोणताही धोका नाही”, म्हणत उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -