Photo: भारतीय संघातील असे खेळाडू ज्यांना बायोबबलनंतरही कोरोनाने गाठलेच

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (मंगळवारी) होणारा दुसरा टी-२० सामना पुढे ढकलण्यात आला आहे. या आधी देखील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूनां कोरोनाची लागण झाली होती.