साउथ अभिनेता विजय देवरकोंडाने आता बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. येत्या काळात विजय देवरकोंडा ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबतच अभिनेत्री अनन्या पांडे सुद्धा दिसून येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -