घरदेश-विदेशस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी साजरी झाली 'पिन कोडची' पन्नाशी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी साजरी झाली ‘पिन कोडची’ पन्नाशी

Subscribe

भारतीय टपाल खात्याने 15 ऑगस्ट 1972 साली पात्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्ह्णून 'पिन कोड' म्हणजेच (पोस्टल इंडेक्स नंबर कोड) ही पद्धत अंमलात आणली होती.

मोबाईल आणि इंटरनेट येण्यापूर्वीचं जग हे पात्रांनीच व्यापलं होतं. संवाद साधण्याचं एक उत्तम माध्यम म्हणून पत्र सर्वांच्याच पसंतीस उतरलं होतं. पण काळ जसा पुढे सरकत गेला तश्या बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. कोणीतरी पत्र पाठवणं आणि आतुरतेने कुणीतरी त्या पटरची वाट पाहणं याची जागा आता इंटरनेटने घेतली आहे. इंटरनेटच्या या धावत्या आणि वेगवान युगात ऑनलाईन खरेदीपासून ते अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणापर्यंत सगळ्याच ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पिन कोड'(pin code)भारतीय टपाल खात्याने 15 ऑगस्ट 1972 साली पात्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्ह्णून ‘पिन कोड’ म्हणजेच (पोस्टल इंडेक्स नंबर कोड) ही पद्धत अंमलात आणली होती.

हे ही वाचा – उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार; अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही केली दरवाढ

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी याच ‘पिन कोड’ची पन्नाशी साजरे करण्यात आली. टपाल खात्याचे काम सुलभ आणि अधिक वेगाने होण्यासाठी ‘पिन कोड’ ही पद्धत सुरु करण्यात आली. सध्याच्या युगात इंटरनेट आणि गूगल मॅप सारख्या अद्ययावत सुविधा असतानाही ‘पिन कोड’ चं(pin code) महत्व आणि गरज आजही अबाधित आहे.’पिन कोड’ मध्ये असलेल्या या सहा अंकात तुम्ही कोणत्या शहरात राहता ? तुम्ही राहात असलेलं शहर कोणत्या राज्यात आहे? त्याचबरोबर तुम्ही राहात असलेल्या भागात जवळचे टपाल खाते कोणते ? ही सगळी माहिती ‘पिन कोड’ च्या सहा नाकात दडलेली असते.

हे ही वाचा – काँग्रेसला मिळणार अखेर नवा अध्यक्ष; 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार निवड

- Advertisement -

पिन कोडचे जनक कोण

संस्कृत आणि पाली भाषेचे जनक टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या ‘पिन कोड’चा शोध लावला ते टपाल खात्यात कार्यरत असताना 1972 साली य या ‘पिन कोड’ सेवेचा प्रत्यक्ष सेवेत वापर केला गेला. ‘पिन कोड’ चे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी भारत सरकारच्या संचार खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पहिले होते.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला उदंड प्रतिसाद; वेबसाइटवर आपलोड झाले तब्बल 5 कोटींपेक्षा अधिक सेल्फी

अंकांचे नेमके अर्थ काय

१) राज्यांचे स्वतंत्र असे आठ विभाग करण्यात आले आणि त्या प्रत्येक विभागाला एक अंकी क्रमांक देण्यात आला.

२) नववा विभाग सैन्यदलाच्या टपाल सेवेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

३) पिन कोडच्या सहा अंकांमध्ये पहिला अंक हा संबंधित राज्य पूर्व, पश्चिम आणि दक्षिण कोणत्या विभागात येते हे दर्शवतो.

४) तर दुसरा अंक त्या विभागातील नेमका उपिभाग कोणता ते स्पष्ट करतो.

५) तिसऱ्या अंकातून नेमका जिल्हा कोणता ते स्पष्ट होते.

६) शेवटच्या तीन अंकातुन जिल्ह्यातील विशिष्ट शहर, परिसर आणि तेथील जवळचे टपाल खाते इत्यादी तपशील स्पष्ट करतो.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -