घरराजकारणआता गोविंदांचे आरक्षण देखील वादाच्या भोवऱ्यात! राष्ट्रवादीची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून समर्थन

आता गोविंदांचे आरक्षण देखील वादाच्या भोवऱ्यात! राष्ट्रवादीची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून समर्थन

Subscribe

मुंबई : दहीहंडी उत्साह काल मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहींडी उत्सवासाठी केलेल्या तीन मोठ्या घोषणांची पार्श्वभूमी त्याला होती. त्यात गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची घोषणेचा समावेश होता. पण हीच घोषणा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राष्ट्रवादीकडून त्यावर टीका होत आहे. तर, सत्ताधाऱ्यांकडून त्याचे समर्थन केले जात आहे.

राज्य सरकारने दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने गोविंदांचा उत्साह दुणावला होता. तसेच. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीची ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय, सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ गोविंदांनाही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

- Advertisement -

गोविंदांना नोकरीत 5 टक्के आरक्षण देणार, अशी घोषणा सरकारने केली असली तरी, गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार? मला गोविंदांना नाउमेद करायचं नाही, पण जी मुले-मुली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय? असे सवाल विरोधी पक्षनेते आजित पवार यांनी केले आहेत.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर टीका केली आहे. दहीहंडीतील गोविंदांना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच असल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली, असं ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

भाजपाचे प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. राज्य सरकारने गोविंदांना नव्याने कुठलेही आरक्षण दिलेले नाही. खेळाडूंना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणाची तरतूद पूर्वीपासूनच आहे. त्याअंतर्गत ठराविक खेळांना मान्यता देण्यात आली आहे. या यादीत आता दहीहंडीचा समावेश करण्यात आला आहे. गोविंदांसाठी अतिरिक्त आरक्षणाची तरतूद केलेली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून खेळाडूंना मिळणाऱ्या पाच टक्के आरक्षणावर विरोधकांचा आक्षेप आहे का? असा सवालही त्यांनी केली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -