घरराजकारणवडील रुग्णालयात आणि युवराज आदित्य रमले होते लंडनच्या पब, फूटबॉल मॅचमध्ये; शेवाळेंचा...

वडील रुग्णालयात आणि युवराज आदित्य रमले होते लंडनच्या पब, फूटबॉल मॅचमध्ये; शेवाळेंचा आरोप

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील दोन्ही गटांमधील आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचला आहे. ‘गद्दार’, ‘खोके’ असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे व अन्य नेत्यांकडून शिंदे गटावर वारंवार होत आहे. त्याला शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया होत असताना तसेच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असतानाही युवराज आदित्य ठाकेर पब आणि फूटबॉल मॅचमध्ये रमले होते, असा पलटवार शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.

गेल्या जूनमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी ‘उठाव’ केल्याने ठाकरे सरकार कोसळले होते. परिणामी हा उठाव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांच्या जिव्हारी लागला. या 40 आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत, या सर्वांनी ‘खोके’ घेतल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील अन्य नेत्यांनी करण्यास सुरुवात केली. शिंदे गटाने याला प्रत्युत्तर देताना सुरुवातीला ठाकरे कुटुंबीयांवर थेट वार केला नाही. पण आता मात्र ठाकरे पिता-पुत्रावर टीका केली जात आहे. विशेषत: आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे.

- Advertisement -

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत काही दाखले दिले. नंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत या आरोपांचा पुनरुच्चार करताना त्याची सविस्तर माहितीही दिली. त्यांचा जन्म आणि तारुण्य ‘खोक्या’मध्ये गेले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंकडून सत्तेचा गैरवापर
स्कॉटलंड येथे 31 ऑक्टोबर 2021 ते 12 नोव्हेंबर 2021 यादरम्यान झालेल्या कॉप-26 (COP-26) या पर्यावरणविषयक जागतिक परिषदेसाठी आदित्य ठाकरे गेले होते. ही परिषद संपल्यानंतर पुढील दोन-तीन आठवडे ते तिथेच राहिले. मुळात सरकारी खर्चात त्यांचा हा दौरा असताना दोन-तीन आठवडे मुक्काम त्यांनी वाढवला. त्याच काळात त्यांचे वडील उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होते आणि त्यांचे ऑपरेशन करण्यात येणार होते. शिवाय, 17 नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. तरीही आदित्य ठाकरे स्कॉटलंडलाच थांबले आणि तिथे ते पबमध्ये जात होते. फूटबॉलचे सामनेही त्यांनी पाहिले. तिथे त्यांचे मित्र पुनिया पारेख हे देखील त्यावेळी त्यांच्याबरोबर होते, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -