घररायगडमाथेरानमधील सांडपाणी प्रकल्पासाठी ४७ कोटींचा निधी मंजूर

माथेरानमधील सांडपाणी प्रकल्पासाठी ४७ कोटींचा निधी मंजूर

Subscribe

जंगल संपत्ती,शुद्ध पाण्याचे झरे व डोंगर दर्‍यांनी समृद्ध अशा पर्यावरण संवेदनशील माथेरान शहरातून निघणारे मलनि:सारण वाहिन्यांतील पाणी थेट येथील डोंगर दर्‍यांमध्ये असणार्‍या नदी पाण्याचे डोह तसेच आजुबाजूच्या परिसरातील धरणामध्ये जाऊन पाणी प्रदुषण होते. ते थांबवण्यासाठी मल जल प्रक्रीया केंद्र ( एसटीपी प्लांट) शहरातील वेगवेगळ्या ६ भागात उभारण्यात येणार आहे.

दिनेश सुतार: माथेरान
जंगल संपत्ती,शुद्ध पाण्याचे झरे व डोंगर दर्‍यांनी समृद्ध अशा पर्यावरण संवेदनशील माथेरान शहरातून निघणारे मलनि:सारण वाहिन्यांतील पाणी थेट येथील डोंगर दर्‍यांमध्ये असणार्‍या नदी पाण्याचे डोह तसेच आजुबाजूच्या परिसरातील धरणामध्ये जाऊन पाणी प्रदुषण होते. ते थांबवण्यासाठी मल जल प्रक्रिया केंद्र ( एसटीपी प्लांट) शहरातील वेगवेगळ्या ६ भागात उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ४७ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजुर करण्यात आल्याने शिवसेनेच्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातील स्थानिक आमदार आणि खासदारांसह ठाकरे आणि शिंदे गटाचे समर्थक यांच्याकडून शहराच्या एसटीपी प्लांटसाठी पाठपुरावा कोणी केला, यावर माथेरानच्या राजकारणात सध्या श्रेयवादाचा शिमगा रंगल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता आहे आणि कर्जत खालापुरचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे तसेच मावळचे स्थानिक खासदार आप्पासाहेब बारणे हे दोघेही शिंदे गटाचे विश्वासू आणि मुरब्बी राजकारणी मानले जातात. मात्र माथेरान पर्यटनस्थळावर उभारल्या जाणारर्‍या एसटीपी प्लांटच्या निधीवरुन या विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. यासाठी खासदार बारणे यांनी परिपत्रक काढत कशाप्रकारे आपण पाठपुरावा केला याचा लेखाजोखा मांडला आहे तर आमदार थोरवे यांनी देखील शासनाकडे केलेल्या मागणी पत्रासह पाठपुव्याचे कागदपत्र सादर करत ४७ कोटींचा भरीव निधी आणण्यासाठी आपणदेखील पाठपुरावा केल्याचा दावा ठोकला आहे.यामध्ये ठाकरे गटाच्या तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरानचा एसटीपी प्लांटचा प्रस्ताव शासनाकडे आपणच सादर केल्याचे प्रमाण देत खासदार बारणे यांच्या सह मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रस्तावात जातीने लक्ष घातल्याचे नमुद करत मुख्यमंत्री शिंदेंसह खासदार बारणें तसेच विद्यमान व तत्कालिन मुख्याधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले आहे. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे (शिंदे) यांनी अगदी कमी वेळेत मानव अधिकार न्यायालयात या प्लांट विषयी बाजु मांडल्याने व निधी मंजुर करुन आणल्यामुळे भरभरुन कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.

पाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रस्तावित
माथेरानची भौगोलिक परिस्थिती पाहता याठीकाणी वसलेली मोठी हॉटेल्स, लॉजिंग तसेच लोकवस्ती भाग लक्षात घेता येथील शहराला पाण्याच्या वापराची क्षमता तीन ते चार दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी आहे. त्यापैकी ५० टक्के सांडपाणी स्वरुपात डोंगर दर्‍यांमध्ये वाहत जाऊन आजुबाजूच्या परिसरातील ओढे, नदी तसेच धरणासारख्या पाणवठ्यांवर प्रदुषण होते. यातील दोन दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या पाण्यावर तृतीयस्तरीय प्रक्रिया केल्यास त्या पाण्याचा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्त कामासाठी करण्याचे प्रस्तावित आहे.

- Advertisement -

एसटीपी प्लांटच्या मागणीला यश
प्रस्तावित मल जल प्रक्रिया केंद्रांचे प्रचालन आणि परिरक्षण करुन माथेरान शहरात नवीन सहा मल जल प्रक्रिया केंद्रांचा आराखडा तयार करून बांधकाम आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्यामुळे गेले कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर होत असलेल्या शहराच्या एसटीपी प्लांटच्या मागणीला अखेर यश आल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात असून यासाठी प्रयत्नशील लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी तसेच राज्यशासनाचे माथेरानकरांकडून आभार व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -