घररायगडजिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.२८टक्के; यंदाही मुलींची बाजी

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.२८टक्के; यंदाही मुलींची बाजी

Subscribe

नागोठणे येथील ग्रामपंचायतमधील सफाई कामगार योगेंद्र चौलकर यांची मुलगी श्रावणी ही दहावीच्या परिक्षेत ८८ टक्के गुण मिळवून को.ए.सो.च्या अग्रवाल विद्यामंदिर या शाळेत तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. याबद्दल तिचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,सर्व सदस्य,ग्रामसेवक राकेश टेमघरे आदींनी अभिनंदन केले. नुकत्याच झालेल्या नागोठणे पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनी श्रावणीचे वडील योगेंद्र यांचा आदर्श कामगार म्हणून सन्मान करण्यात आला होता.

रत्नाकर पाटील/अलिबाग
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून जिल्ह्याचा निकाल ९५.२८ टक्के लागला आहे. बारावी प्रमाणे दहावीमध्येही उत्तीर्ण होण्याच्या शर्यतीत मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल तळे तालुक्याचा ९७.१५ टक्के तर सर्वात कमी निकाल खालापूर तालुक्याचा ९२.४९ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात मुंबई विभागात अव्वल राहिलेल्या जिल्ह्याने दहावीच्या निकालातही मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.
जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ३४ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरले होते. यामध्ये १८ हजार ८२ मुले आणि १६ हजार ६२२ मुलींचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेसाठी प्रत्यक्ष ३४ हजार ४७४ विद्यार्थी हजर राहिले होते. यामध्ये १७ हजार ९६० मुले आणि १६ हजार ५१४ मुलींचा समावेश आहे. शुक्रवारी निकाल लागल्यानंतर ३२ हजार ८४७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ८८१ मुले आणि १५ हजार ९६६ मुलींचा समावेश आहे . जिल्ह्यात मुली ९६.६८ टक्के तर मुले ९३.९९ टक्के उत्तीर्ण झाली आहेत. रायगड जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये ३२ हजार ८४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . यामध्ये विशेष प्राविण्य मिळवून ८ हजार ९५१ , १२ हजार ८८७ विद्यार्थी पहिल्या श्रेणीत , ८ हजार ६८६ विद्यार्थी दुसर्‍या श्रेणीत तर २ हजार ३२३ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.
पुनर्परिक्षार्थींचा निकाल ७१.७८ टक्के
जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १ हजार १७२ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरले होते. यामध्ये ७१६ मुले आणि ४५६ मुलींचा समावेश आहे यापैकी १ हजार १३४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये ६८७ मुले आणि ४४७ मुलींचा समावेश आहे. यामध्ये ८१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४६८ मुले आणि ३४६ मुलींचा समावेश आहे . उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३७ विद्यार्थी विशेष प्राविण्य , १९९ विद्यार्थी प्रथम श्रेणी , ३१३ विद्यार्थी द्वितीय श्रेणी आणि २६५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील पुनर्परिक्षार्थींचा निकाल ७१.७८ टक्के लागला आहे . यामध्ये ६८.१२ टक्के मुले आणि ७७.४० टक्के मुलींचा समावेश आहे .

सफाई कामगाराच्या मुलीने मिळविले ८८ टक्के गुण
नागोठणे : येथील ग्रामपंचायतमधील सफाई कामगार योगेंद्र चौलकर यांची मुलगी श्रावणी ही दहावीच्या परिक्षेत ८८ टक्के गुण मिळवून को.ए.सो.च्या अग्रवाल विद्यामंदिर या शाळेत तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. याबद्दल तिचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,सर्व सदस्य,ग्रामसेवक राकेश टेमघरे आदींनी अभिनंदन केले. नुकत्याच झालेल्या नागोठणे पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनी श्रावणीचे वडील योगेंद्र यांचा आदर्श कामगार म्हणून सन्मान करण्यात आला होता.

- Advertisement -

म्हसळे तालुक्याचा निकाल ९५.९२टक्के
म्हसळे: तालुक्याचा इयत्ता १० वी शालांत परीक्षा २०२३ चा निकाल ९५.९२ टक्के इतका लागला आहे. ६७७ परिक्षार्थींपैकी ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हसळे न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९८.११ इतका लागला असून १०६ पैकी १०४ विध्यार्थी पास झाले आहेत. शाळेची ज्ञानेश्वरी पागिरे ही विद्यार्थिनी ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम, रोहन दिवेकर ९४.४०टक्कगुण मिळवुन दुसरा तर समरीन शहाने ९१ टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेतील सलोनी घाटगे ८९ टक्के आणि श्रीयन करडेने ८४.४० टक्के गुण मिळवुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत मागास प्रवर्गात रोहन दिवेकर पहिला, सृष्टी राठोड ८४.६० टक्के दुसरी तर सुशिल राठोड ८३.६०टक्के गुण मिळवुन तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तालुक्यातील १९ हायस्कूलपैकी ९ शाळांचा निकाल १००टक्के लागला आहे. अंजुमन हायस्कूलची वस्ता अक्षा नौशाद प्रथम (८८.४० टक्के गुण),मोहंमद अब्दुल मोईद द्वितीय (८६.६० टक्के गुण) तर बांगी या मुईद कमरु द्दीन तृतीय ( ८५.४० टक्के गुण) आला. आयडियल इंग्लिश स्कूलचा निकाल याही वर्षी १००टक्के लागला असून इकरा रेहमत उल्ला घराडे प्रथम ( ९४.६ टक्के),द्वितीय क्रमांक महेक रफीअहमद हुर्जूक (९२ टक्के ),आणि तृतीय क्रमांक हसवारे रदवा मंजूरने ९०.४ टक्के मिळवुन सुयश प्राप्त केले आहे.

चौकमधील शाळेत निती कदम प्रथम
चौक: सर नौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक या माध्यमिक विद्यालयाचा ८९.६५ टक्के निकाल लागला असून निती मंगेश कदम ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. खालापूर तालुक्यातील सर नौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक या शाळेत १७४ विद्यार्थ्यांनी १० वी ची परीक्षा दिली होती. त्यातील १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हिमानी गावडे ८६.८० टक्के, सिद्धी बांदल ८५.२० टक्के, समीक्षा गायकर ८३.८० टक्के, विदिशा भोपी ८३.८० टक्के, स्नेहल पराड ८१.२० टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. विद्याप्रसारणी चौक या संस्थेच्या विद्यामंदिर सारंग शाळेचा निकाल ९२.८५ टक्के लागला आहे. निशांत शिर्के ८४.८ टक्के, साहिल गावंडे ७९.८ टक्के, गायत्री शिर्के ७८.४ टक्के, ऋशाली पाटील ७४.८ टक्के, कल्याणी गावंडे ७४.२ टक्के गुण प्राप्त करून हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केले आहे.

- Advertisement -

सर एस ए हायस्कूलचा निकाल ९४.५९ टक्के
मुरुड:  सर एसए हायस्कुलमधून १० वी च्या परिक्षा करिता १४८ परिक्षार्थींपैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १२ विद्यार्थी ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ८ विद्यार्थी थोडक्या गुणांकरिता नापास झाले. शाळेचा निकाल मराठी माध्यम ९५.४० टक्के तर सेमीचा १००टक्के निकाल आहे. प्रथम क्रमांक अनिरुद्ध चोरघे ९५.४० टक्क, ,
द्वितीय क्रमांक स्नेहल राठोड ८८.६० टक्के गुण तर तृतीय क्रमांक शिवम चव्हाण ( ८६.८० टक्के) याने मिळविला.

नज अ‍ॅकॅडमी, सुविद्या हायस्कूलचा निकाल १०० टक्के
नांदगाव: दहावी परीक्षेत मुरुड तालुक्यातील मजगावच्या नज अ‍ॅकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूल आणि मुरुडच्या सुविद्या इंग्रजी माध्यम हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. नज एज्युकेशन सोसायटी संचलित सुविद्या इंग्रजी हायस्कूलमधून विया जैन ८९.४० टक्के गुण मिळवून पहिली आली. विधी जैन ८८.६०टक्के गुण मिळवून दुसरी तर श्रवण पुलेकर ८८.४०टक्के गुण मिळवून तिसरा आला.
मजगाव येथिल नज कॅडमी हायस्कूलमधून कौत्सुभ कासार ८३ टक्के गुण मिळवून प्रथम, शुभम राठोड ७८.२०टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर ु.रेहान मुझफ्फर दळवी ७५.४०टक्के गुण मिळवून तिसरा आला. यशवंतनगरच्या श्री छत्रपती शिवाजी नुतन विद्यालयाचा ८३.८७ टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १२४ विद्यार्थ्यांपैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातून सुरभी कोतवाल आणि जिज्ञासा रावजी दोघीही प्रत्येकी ८८.८८टक्के गुण मिळवून प्रथम आल्या. यश खुळपे ८५.२०टक्के गुण मिळवून दुसरा, सायली पाटील ७९.८०%गुण मिळवून तिसरी तर पूर्वा तरे ७९टक्के गुण आणि रिया शेलके ७७.८०टक्के गुण मिळवून अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
०००००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -