घररायगडखालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीत विहीर; भरावामुळे नदीपात्र घटले, कारवाईची अपेक्षा

खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीत विहीर; भरावामुळे नदीपात्र घटले, कारवाईची अपेक्षा

Subscribe

खालापूर तालुक्यातील महड गावाच्या हद्दीतील पातळगंगा नदीत ’जलजीवन मिशन’ अंतर्गत विहीर खोदण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून विहीर खोदतांना निघणारे दगड, माती थेट नदीत टाकून भराव करण्यात आला आहे. त्यामुळे बारामाही वाहणारी पातळगंगा नदीचा प्रवाह लहान झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नदीत अतिक्रमण तर दुसरीकडे नियमांची पायमल्ली करणार्‍या ठेकेदारावर आणि याबाबत कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई होणार का? नदी, नाले भरणी होऊन घरे, बिल्डिंग झाल्यावर अधिकारी लक्ष देणार का? की नोटीस पे नोटीस बजावत राहणार? असे संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारले जात आहेत.

हाळ खुर्द: खालापूर तालुक्यातील महड गावाच्या हद्दीतील पातळगंगा नदीत ’जलजीवन मिशन’ अंतर्गत विहीर खोदण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून विहीर खोदतांना निघणारे दगड, माती थेट नदीत टाकून भराव करण्यात आला आहे. त्यामुळे बारामाही वाहणारी पातळगंगा नदीचा प्रवाह लहान झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नदीत अतिक्रमण तर दुसरीकडे नियमांची पायमल्ली करणार्‍या ठेकेदारावर आणि याबाबत कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई होणार का? नदीपात्रात होणारे अतिक्रमण पाटबंधारे विभागाकडून का रोखले जात नाही? नदीत झालेले अतिक्रमण का तोडले जात नाही? नदी, नाले भरणी होऊन घरे, बिल्डिंग झाल्यावर अधिकारी लक्ष देणार का? की नोटीस पे नोटीस बजावत राहणार? असे संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारले जात असतानाच सदर प्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कारवाईची अपेक्षा जात आहे.
पातळगंगा नदीत झालेल्या भरावाबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी गुंटूरकर यांनी सांगितले की, पातळगंगा नदीत असा भराव झालेलाच नाही. अतिक्रमण नसल्याचा दावा करीत माझ्यासोबत चला आणि प्रत्यक्ष पाहणी करा, अशी खात्रीशीर माहिती दिली, पण गुंटूरकर यांनी पाताळगंगा नदीतील सुरु असलेल्या साईटवर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर काय खरं, काय खोटं? हे प्रत्यक्ष पाहिले. साईटवर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर नदीत विहीर खोदण्यात आल्याची माहिती नव्हतीच. जलजीवन मिशन विभागाने याबाबत साधे कळविले नाही, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी गुंटूरकर यांनी जलजीवन मिशन अधिकारी जगताप यांच्या उपस्थितीत सांगितले.
जोरदार आणि संततधार पाऊस पडला की, खालापूरला पुराच्या आपत्तीचा धोका निर्माण होत असतो. यापूर्वी ही आपत्ती ओढवलेली आहे. आता नदी फाट्यात दगडमाती पडत असल्याने हा फाटा बुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदी बुजविल्यास जोरदार पावसावेळी पाणी बाहेर फुटून पुराची आपत्ती ओढवण्याचा धोका आहे, अशी भीतीही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित
कर्जत आणि खालापूर तालुक्यातील नद्यांचे सौंदर्य तसेच संतुलन हा नेहमी चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे. पातळगंगा नदीसह उल्हास, उल्हास पेज नदींना पूर आला की, नदी, नाल्यांतील अतिक्रमणांचा विषय ऐरणीवर येतो. अतिक्रमण होणे तसेच दुषित पाणी नदी-नाल्यांत सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. खालापूर – कर्जत तालुक्यात गेल्या वर्षांपासून नदी, नाल्यात होणार्‍या अतिक्रमणाने जोर धरला आहे. नदीच्या किनार्‍याला किंवा पात्रात होणार्‍या अतिक्रमणांमुळे गावांना पूररेषेच्या दिशेने घेऊन जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
कामगारांच्या सुरक्षिततेचे काय?
पाताळगंगा नदीत विहिरीचे काम करीत असताना नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विहीर अंदाजे पंधरा ते वीस फूट खोल खोदण्यात आली आहे. विहीरीच्या परिसरात सुरक्षेसाठी कोणतेही लोखंडी बॅरिगेड लावण्यात आलेले नाहीत. विहीरीचे काम करणार्‍या मजुरांनाच्या डोक्यात हेल्मेट, पायात सेफ्टी शूज, रिडीयम जॅकेट सुध्दा नसल्याचे दिसून आले आहे. अंदाजे पंधरा ते वीस फूट खोल खोदण्यात आलेल्या विहीरीत लोखंडी सळया आणि काँक्रिट भरण्याचे काम मजूर खाली उतरून करीत आहेत. खालून वरपर्यंत लोखंडी बॅरिगेट लावण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. खाली काम करीत असताना एकाद्यावेळी बाजूची माती सरखली, मोठे दगड डोक्यात पडले, तर या मजुरांच्या जीवाचे काय होणार? नदीत पाणी पिण्यासाठी येणारी जनावरे या उघड्या विहीरीत पडले तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -