घररायगडलाकडापासून शोभेच्या वस्तू बनविणारा कलाकार; छंद बनला उदरनिर्वाहाचे साधन

लाकडापासून शोभेच्या वस्तू बनविणारा कलाकार; छंद बनला उदरनिर्वाहाचे साधन

Subscribe

उरण शहरातील मोरा फड नं.५ मध्ये राहणारे राम पांचाळ यांची घरची परीस्थिती अत्यंत गरिबीची. मात्र गरीबीवर मात करून त्यांनी लाकडातून विविध मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.

सुभाष कडू: उरण
सर्वसाधारणत: कोणता तरी काही एक छंद असतोच,आपल्या आवडी प्रमाणे छंद जोपासला जातो.कुणाला गाणी गाण्याचा छंद असतो तर कुणाला रांगोळी काढण्याचा, तर कुणाला पेंटिंगचा छंद तर कुणाला सायकलवरून प्रवास करायचा तर कुणाला गिर्यारोहणाचा तर कुणाला खाण्याचा असे विविध छंद आवडीनुसार जोपासत असतात.परंतु राम पांचाळ या अवलियाने गरिबीवर मात करून छंदातून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडातून कोरीव काम करून विविध आकर्षक मूर्ती बनविण्याचा छंद जोपासला आहे.लाकडापासून विविध शोभेच्या वस्तू बनवून त्या विक्रीतून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याची जवाबदारी पेलली आहे.
शहरातील मोरा फड नं.५ मध्ये राहणारे राम पांचाळ यांची घरची परीस्थिती अत्यंत गरिबीची. मात्र गरीबीवर मात करून त्यांनी लाकडातून विविध मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.
आज पर्यंत पांचाळ यांनी लाकडातून छत्रपती शिवाजी महाराज,धावता घोडा, मच्छिमारी नौका,गरुड, हरिण, सात घोडे आदि मूर्ती बनविल्या आहेत. यामध्ये मच्छिमारी नौकेच्या कलाकृतीला विशेष मागणी असते. त्यांची कलाकुसर पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. हा छंद त्यांचा व्यवसाय झाला असून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या कामात त्यांना पत्नी सारिका, मुलगा मयूर यांची मदत होत असते.
मी लहान असतांना वडील दगडातून मूर्ती घडवित असत. त्यांच्या कडून प्रेरणा घेतली आणि त्यातून घडलो . मला चित्रकलेची लहानपणापासूनच आवड असल्याने लाकडापासून मूर्ती बनविण्याचा छंद जोपासला. त्यामुळे अनेक मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून कुटुंबियाचे उदरनिर्वाह करीत आहे.
– राम पांचाळ
कलाकार, उरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -