घररायगडQR Code घर क्रमांक असलेली चेंढरे ग्रामपंचायत राज्यात सर्वप्रथम

QR Code घर क्रमांक असलेली चेंढरे ग्रामपंचायत राज्यात सर्वप्रथम

Subscribe

रायगड जिल्हा परिषद, अमृतग्राम डिजीटल करप्रणाली अंतर्गत, चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील सर्वप्रथम QR Code घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत ठरली आहे. तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी अणि पाणीपट्टी प्रत्येक घराला दिलेल्या QR Code ने मोबाईल अँड्राईड अ‍ॅ़पद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायत आर्थिक दृष्ठ्या सक्षम करण्याचा मुलभूत पाया म्हाणजे करवसुली आहे त्याच प्रमाणे कोविड-१९ च्या वेळेस नागरीकांना बर्‍याचश्या गोष्टी घरबसल्या मिळाव्यात अशी अपेक्षाही निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने सदरची अमृतग्राम डिजीटल करप्राणाली चेंढरे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांनी विकसीत केलेली असून ती अत्यंत उपयुक्त आहे.

अलिबाग: रायगड जिल्हा परिषद, अमृतग्राम डिजीटल करप्रणाली अंतर्गत, चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील सर्वप्रथम QR Code घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत ठरली आहे. तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी अणि पाणीपट्टी प्रत्येक घराला दिलेल्या QR Code ने मोबाईल अँड्राईड अ‍ॅ़पद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायत आर्थिक दृष्ठ्या सक्षम करण्याचा मुलभूत पाया म्हाणजे करवसुली आहे. घरपट्टी आणि पाणी पट्टी वसुलीची पारंपारिक पध्दत तितकीशी प्रभावीपणे राबविता येत नाही तसेच आजचे डिजीटल युग अँड्राईडचा वापर सर्रासपणे करीत आहेत. त्याच प्रमाणे कोविड-१९ च्या वेळेस नागरीकांना बर्‍याचश्या गोष्टी घरबसल्या मिळाव्यात अशी अपेक्षाही निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने सदरची अमृतग्राम डिजीटल करप्राणाली चेंढरे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांनी विकसीत केलेली असून ती अत्यंत उपयुक्त आहे.
सदर करप्रणाली सर्वकष उपयुक्त होण्याच्या दृष्टीने रा.जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी स्वत: सदर संगणकीय प्रणालीचे सुक्ष्म निरीक्षण करुन त्यामध्ये अतिरीक्त सुधारणा सुचवून त्याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल अशा प्रकारे विकसित करुन घेतली आहे. जेणे करुन पाणी पटटी आणि घरपटटी वसुली जास्तीत जास्त करण्यासाठी नियोजन आणि पाठपुरावा करणे सुलभ झाले असल्याचे मत सरपंच स्वाती पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच स्वाती पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, पंचायत समिती उपसभापती मिनल माळी उपसरपंच प्रणिता म्हात्रे व सदस्य यतिन घरत, ममता मानकर, रोहन पाटील, ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड, टेक्नीकल टीम ललीत कदम, निलेश सावर्डेकर, देवेश गवस स्नेहल मोरे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

घरपट्टी,पाणी पट्टी वसुली बाबतचे अहवाल पाहता येतात
सदरच्या संगणकीय प्रणालीची वैशिष्टयनुसार जुने पारंपारिक पध्दतीने घराच्या दरवाज्यावर दर्शविलेले घरक्रमांक आता QR Code च्या पध्दतीद्वारे दर्शविले आहेत. सदर QR Code द्वारे खातेधारकाची माहिती संकलीत केली आहे आणि त्याद्वारे खातेधारकाची घरपट्टी व पाणी पट्टीवसुली ही मोबाईल ऍ़प द्वारे UPI/ रोख/ धनादेश/ क्रेडिट कार्ड – डेबीटकार्ड तसेच नेट बँकींग द्वारे केली जाते तसेच घरपट्टी आणि पाणी पट्टी वसुली झाल्याची पावती संबंधित खातेधारकास मोबाईल वर पीडीएफ स्वरुपात प्राप्त होते. घरपट्टी व पाणी पटटी चा डिमांड व सवलतीचा संदेश संगणकीय प्रणालीद्वारे खातेधारकास प्राप्त होईल. घरपट्टी आणि पाणी पट्टीवसुली बाबतचे अहवाल पाहता येतात.

- Advertisement -

ग्रामपंचायतीच्या उप्तन्न वाढीस आधारभूत
खातेधारकास आपली घरपटटी व पाणीपटटी घरबसल्या लिंक द्वारे सुध्दा भरता येणे शक्य झाले आहे. या प्रणालीचा वापर करुन अँड्राईड मोबाईल आणि डेस्कटॉप कॉम्प्यूटर च्या माध्यमातून अधिकृत अधिकारी आणि कर्मचा-यांना वसुली करणे सोपे झाले आहे.अशी ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली ग्रामपंचायतीच्या उप्तन्न वाढीस निश्चीतच आधारभूत झाली आहे. चेंढरे ग्रामपंचायती मधील सर्व खातेदारांचा डेटा अचुकपणे अपडेट करुन ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली यंत्रणा यशस्वीपणे राबविणारी चेंढरे ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत आहे.

========

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -