घररायगडसंपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री

संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री

Subscribe

पालघरमध्ये पर्यटन क्षेत्र तयार करायचे आहे.

रायगडमध्ये न्हावा-शेवा टप्पा ३ पाणी प्रकल्पाच्या नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधताना राज्यातील विकासकामांवर भर दिले असल्याचे सांगितले. पनवेलसह रायगडमध्ये येत्या काळात प्रचंड लोकांची गर्दी होणार आहे. त्यांना लागणाऱ्या पाण्याची पुर्तता करण्यासाठी आतापासून तयारी सुरु आहे. राज्यातील जनतेला पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे पाणी संकट दुर करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यावर असलेल्या पाणी संकटावर मात करण्यासाठी अनेक प्रकल्प आणि उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. संपुर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बणवण्याचा प्रयत्न करणा असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २१ फेब्रुवारीला जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोर्चा, आंदोलने, मोठ्या कार्यक्रमांवर बंदी असल्याचे सांगितले. परंतु आजचा कार्यक्रमात गर्दी होते का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला होता. परंतु मोजक्याच लोकांच्या उपस्थित रायगडमध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, काल मी फेसबुक लाईव्हमधून जनतेला हक्काने सूचना दिल्यात, मोर्चा, आंदोलने मोठ्या कार्यक्रमांवर बंदी असताना आजचा कार्यक्रमाला मोठी गर्दी होते की काय? असा वाटले होते. मी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं देखील होते की, गर्दी नको मात्र या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी दिसतेय कार्यक्रमाच्या सुरुवातीला हार-तुरे न देता सॅनिटायझर देऊन स्वागत केलं हे गुलाबरांवांनी बरे केले.

- Advertisement -

हेही वाचा : लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घ्या – अजित पवार


आत्मनिर्भर होतो आहोत. राज्यात स्वदेशी मेट्रो कोचचे अनावरण करण्यात आले. येत्या काळात आपण महाराष्ट्रात मेट्रो कोचचे निर्मिती करणार आहोत. आत्मनिर्भर होऊन आपण सगळ्या गोष्टी बनवू शकतो. परंतु पाणी बनवू शकत नाही. काही दिवसांपूर्वी जव्हारला जाऊन आलो. पालघर जिल्हा तयार झाला त्याकडे लक्ष देता आले नाही. पुर्वीच्या सरकारनेही दुर्लक्ष केले आपल्या सरकारला १ वर्ष झाला परंतु कोरोनामुळे सर्व अवघड होऊन बसले आहे. पालघरमध्ये पर्यटन क्षेत्र तयार करायचे आहे.

- Advertisement -

जव्हारमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष पाहायला मिळतंय. पाणी थांबवण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. जस आपण अर्थ नियोजन करतो तसेच पाण्याचेही नियोजन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. राज्यात विकास करताना निसर्गाची हानी झाली नाही पाहिजे असे मी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत मत मांडले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -