उधाणाच्या पाण्याने भातशेतीजमिनीचे नुकसान; खारलँड विभागाचे दुर्लक्ष

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील-खारदोडकुले भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी मजगावच्या खाडीला खांब पडून शेतात शिरल्याने येथिल भातशेती जमिनीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेले वालपिक े धोक्यात आले आहे. दरम्यान, याबाबत खारलँड विभागाच्या या भागाकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नांदगाव: मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील-खारदोडकुले भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी मजगावच्या खाडीला खांब पडून शेतात शिरल्याने येथिल भातशेती जमिनीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेले वालपिक े धोक्यात आले आहे. दरम्यान, याबाबत खारलँड विभागाच्या या भागाकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेली पाच वर्षांपासून मजगाव खाडीलगत असलेल्या खारदोडकुले भागात खाडीपरिसरात आलेल्या उधाणाच्या पाण्यामुळे खाडीच्या बंधार्‍याला खांड पडल्याने दरवर्षी शेतात पाणी शिरुन समस्यांना तोंड द्यावे लागत असून आजतागायत शेतकर्‍यांच्या जमिनी व पिकाचे अतोनात नुकसान झाले आणि आताही होत आहे.
याबाबत येथील शेतकरी नथूराम तांबडकर यांनी संबंधित खारलँड विभागाशी शेतकरी बांधवांसह संपर्क साधून अर्ज विनंत्या निवेदने दिली आहेत मात्र अद्यापही याठिकाणी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात आली नसल्याची खंत व्यक्त केली.यंदाही उधाणाचे पाणी शेतात शिरून शेतक-यांना शेतजमीन आणि वालपिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
शासनाच्या खारलँड विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने या भागाची प्रत्यक्ष पाहाणी करून याठिकाणी नदीला पडलेली खांड बुजविण्याची योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी येथील शेतकरी बांधवांच्यावतीने नथूराम तांबडकर यांनी केली आहे.