घररायगडनेरळ -माथेरान रेल्वे मार्गावर मिनी ट्रेन फेर्‍या वाढवण्याची मागणी

नेरळ -माथेरान रेल्वे मार्गावर मिनी ट्रेन फेर्‍या वाढवण्याची मागणी

Subscribe

नेरळ-माथेरान- नेरळ या नेरॉगेज रेल्वे मार्गावर सध्या दर दिवशी येऊन जाऊन २+२ अशा मिनी ट्रेन फेर्‍या चालू आहेत. या ट्रेनला २ सामानाचे बोगी, ३० प्रवाशांची आसन व्यवस्था असलेले ३ सामान्य बोगी तर १६ प्रवा प्रकारे ही मिनी ट्रेन सेवा चालविली जात आहे. मात्र माथेरानला येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या पाहता सदर सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे नेरळ- माथेरान मार्गावर रेल्वे प्रशासनाकडुन जादा ट्रेन चालवल्या जाव्यात, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.

माथेरान: जगभरातून माथेरानला येणार्‍या पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारी माथेरानची मिनी ट्रेन सेवा नेरळ-माथेरान- नेरळ या नेरॉगेज रेल्वे मार्गावर सध्या दर दिवशी येऊन जाऊन २+२ अशा मिनी ट्रेन फेर्‍या चालू आहेत. या ट्रेनला २ सामानाचे बोगी, ३० प्रवाशांची आसन व्यवस्था असलेले ३ सामान्य बोगी तर १६ प्रवा प्रकारे ही मिनी ट्रेन सेवा चालविली जात आहे. मात्र माथेरानला येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या पाहता सदर सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे नेरळ- माथेरान मार्गावर रेल्वे प्रशासनाकडुन जादा ट्रेन चालवल्या जाव्यात, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.
माथेरानमधील आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता तसेच लागून आलेल्या सुट्ट्यांच्या दिवसात पर्यटक आणि स्थानिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील फेर्‍या वाढवण्याची गरज आहे.

रेल्वे तसेच शटल सेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा

- Advertisement -

नेरळ – माथेरान – नेरळ या रेल्वे मार्गावर सकाळी ३ मिनी ट्रेनच्या फेर्‍या आणि संध्याकाळच्या वेळेत नेरळवरुन ४ वाजता सुमारास एक ट्रेन माथेरान मुकामी राहील अशी चालवावी. सकाळच्या वेळेत माथेरान स्थानकातून ही मिनी ट्रेनची फेरी चालविल्यास माथेरानकरांना याचा फायदा होईल अशी पूर्वीप्रमाणे व्यवस्था रेल्वे प्रशासनाने करावी, अशी मागणी पारटे यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माथेरान रेल्वे सेवा तसेच शटल सेवा सुरु होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पारटे सतत पाठपुरावा करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -