घररायगडलालबावटा सोडून दिलीप भोईर यांच्या हाती कमळ; शेकापला मोठा धक्का

लालबावटा सोडून दिलीप भोईर यांच्या हाती कमळ; शेकापला मोठा धक्का

Subscribe

रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदार संघातील नेते दिलीप भोईर उर्फ छोटम यांनी अखेर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भोईर यांच्या भाजपा प्रवेशामुळे शेकापला फार मोठे खिंडार तर पडले आहेच शिवाय शेकाप साठी हा फार मोठा झटका असल्याचे बोलले जाते.

अलिबाग:  रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदार संघातील नेते दिलीप भोईर उर्फ छोटम यांनी अखेर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भोईर यांच्या भाजपा प्रवेशामुळे शेकापला फार मोठे खिंडार तर पडले आहेच शिवाय शेकाप साठी हा फार मोठा झटका असल्याचे बोलले जाते.
मापगाव जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांनी सलग दोन निवडणुकीत भोईर यांच्यावरच विश्र्वास दाखवला होता. २०१२ आणि २०१७ या दोन निवडणुकीत ते शेकापमधून निवडून आले होते. परंतु मागील काही महिने दिलीप भोईर आणि शेकापच्या नेत्यांच्या मध्ये दरी निर्माण झाल्याच्या जोरदार चर्चा होत्या. दरम्यानच्या कालावाधीत भोईर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासोबत दिसत होते.त्यानंतर ते शिंदे गटातील नेत्यांच्या जवळही गेले होते.त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न होता. त्यानंतर त्यांनी भाजपासोबतच जवळीक वाढवली आणि मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
भोईर यांच्या पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच त्यांच्या समर्थकांचादेखील भाजपामध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते.

भोईर यांच्या व्यूहरचनेची चुणूक
दिलीप भोईर हे गेली २५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहेत. पण त्यांच्या राजकीय जीवनाला २००७ नंतर खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली. झिराड ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार निवडून आणत त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यांच्या व्यूहरचनेची चुणूक सर्वानाच कळली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -