घररायगडटाटा स्टीलमध्ये स्थानिकांना रोजगार द्या

टाटा स्टीलमध्ये स्थानिकांना रोजगार द्या

Subscribe

आमदार थोरवेंचा कंपनीला आठ दिवसांचा अल्टीमेट

 

 

- Advertisement -

 

खोपोली: कारखान्यांमध्ये स्थानिक ८० टक्के भरती केली पाहिजे असा शासनाचा देखील कारखान्याना आदेश आहे.मात्र टाटा स्टील कंपनी स्थानिकाना रोजगार देण्यासाठी ठेंगा दाखवत असल्याने आठ दिवसांत स्थानिकांना रोजगार तसेच कामावरून कमी केलेले आठ कामगारांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.
सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील भूषण स्टिल सध्याची नव्याने असलेली टाटा स्टील कारखान्यात स्थानिकांऐवजी परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकाना कंत्राटी पद्धतीने अनेक वर्ष कमी वेतन आणि सोयी सुविधा न पुरविता राबविण्यात येत आहे. काही स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याबाबत तसेच नवीन कामगार भरती बाबत आमदार थोरवे यांनी लक्ष देत स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले. यावेळी सावरोलीचे माजी सरपंच गोविंद बैलमारे, शिंदेगटाचे शाखा प्रमुख संतोष घोसाळकर, रेश्मा आंग्रे,तालुका प्रमुख संदेश पाटील ,तालुका संपर्क प्रमुख संजय नाना देशमुख ,सावरोली ग्रामस्थासह टाटा,व्यवस्थापनावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

स्थानिकांच्या जमीनीवर कारखाना उभा
स्थानिकांनी जमीन दिल्यामुळे कारखाना उभा राहिला असून प्रथम प्राधान्य सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तसेच खालापूर तालुक्यातील बेरोजगार तरुणांचा असल्याचे आमदार थोरवे यांनी व्यवस्थापनाची चर्चा करताना सांगत आठ दिवसात कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -