घररायगडआयुर्वेदाला राजाश्रय मिळाल्यास आयुर्वेद एक नंबर वर असेल - वैद्य रामदास आव्हाड

आयुर्वेदाला राजाश्रय मिळाल्यास आयुर्वेद एक नंबर वर असेल – वैद्य रामदास आव्हाड

Subscribe

आयुर्वेदाच्या उपचाराच्यावेळी पथ्य पाळण्यामुळे काही लोक त्याकडे उपचारासाठी येत नाहीत. त्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करणे गरजेचे आहे. कर्जत मध्ये मोफत आयुर्वेदिक शिबीरांद्वारे प्रसाराचे काम सुरू आहे. त्यासाठी आमच्याकडूनही मोफत औषधे पुरविली जातील. चीन मध्ये सर्वप्रथम अ‍ॅक्युपंक्चर कडे रुग्ण जातात आणि त्याने फरक पडला नाही तर अन्य उपचारकडे वळतात. खरे तर आयुर्वेद आपला असून परदेशात त्याला महत्व आहे. आपल्याकडे उलट आहे. शेवटी आयुर्वेदाकडे येतात. याचेच आश्चर्य वाटते. आयुर्वेदाला राजाश्रय मिळाल्यास आयुर्वेद एक नंबरला असेल.’ असा विश्वास वैद्य रामदास आव्हाड यांनी येथे व्यक्त केला.

कर्जत: ’आयुर्वेदाच्या उपचारानंतर त्याचे परिणाम उशिरा दिसतात. काही लोक म्हणतात आजोबाने आयुर्वेदाचे उपचार सुरू केल्यावर नातवाला त्याचा फायदा होतो परंतु आता तसे राहिले नाही. आयुर्वेदाच्या उपचाराने काही व्याधी काही मिनिटात बर्‍या होतात तर काही व्याधी पाच दिवसात सुद्धा बर्‍या होतात. आयुर्वेदाच्या उपचाराच्यावेळी पथ्य पाळण्यामुळे काही लोक त्याकडे उपचारासाठी येत नाहीत. त्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करणे गरजेचे आहे. कर्जत मध्ये मोफत आयुर्वेदिक शिबीरांद्वारे प्रसाराचे काम सुरू आहे. त्यासाठी आमच्याकडूनही मोफत औषधे पुरविली जातील. चीन मध्ये सर्वप्रथम अ‍ॅक्युपंक्चर कडे रुग्ण जातात आणि त्याने फरक पडला नाही तर अन्य उपचारकडे वळतात. खरे तर आयुर्वेद आपला असून परदेशात त्याला महत्व आहे. आपल्याकडे उलट आहे. शेवटी आयुर्वेदाकडे येतात. याचेच आश्चर्य वाटते. आयुर्वेदाला राजाश्रय मिळाल्यास आयुर्वेद एक नंबरला असेल.’ असा विश्वास वैद्य रामदास आव्हाड यांनी येथे व्यक्त केला.
ज्योविस आयुर्वेदाच्या १८ व्या वर्धापन दिना निमित्त संज्योग – २०२३ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयेशा वाडकर हिने कथ्थक नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. हा सोहळा विविध कार्यक्रमांनी तीन दिवस रंगला. गुरुवर्य वैद्य रामदास आव्हाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, प्राची पिसाट, डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते, माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, वैद्य महेश शिंदे, वैद्य गिरीश भट्टाड, मनीषा सुर्वे आदी उपस्थित होते. डॉ. ज्योती सातपुते यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात ज्योविसच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. तज्ञ डॉक्टरांनी आयुर्वेद अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले. त्यामध्ये प्रथम क्रमांक मानसी अभंग, द्वितीय क्रमांक प्राची चावडे, तृतीय क्रमांक अश्विनी राठोड यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ म्हणून शुभम काळे, नेहाल पाटील आणि हृतिक पांडे यांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन जयंती वाघधरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सातपुते यांनी केले.
याप्रसंगी डॉ. अशोक माने, ज्योती पाटील, डॉ. अस्मिता सावंत, डॉ. सोनाली घाणेकर, पूजा वाघमोडे, नीलम साळवी, ज्योती चव्हाण, प्रीती शहा, कल्पना साळवी, प्राची नारकर, प्रीती वाजपेयी, विद्या खोसरे, रोहित खोरे, संदीप मोरे, जय वाजपेयी आदी उपस्थित होते.

रुग्णांना चांगले उपचार करण्याचे काम – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

- Advertisement -

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, ’अलोपथी उपचार पद्धतीचे चांगल्याप्रकारे संशोधन झाले आहे. त्यामुळे रुग्ण त्या उपचार पद्धतीकडे जास्त प्रमाणात जातात. आयुर्वेद उपचार पद्धतीचे संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच त्याचा योग्य प्रसार व प्रचार अपेक्षित आहे. ज्योविसची टीम चांगले काम करीत आहे.’ असे स्पष्ट केले. माजी आमदार स्व. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी, ’ज्योविस आयुर्वेदच्या वतीने कर्जत तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यात मोफत आयुर्वेदिक शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना चांगले उपचार करण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांना मोफत औषधांचे वाटप सुद्धा करण्यात येते. आळंदी येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तसेच प्रत्येक शनिवारी या रुग्णांना दादर येथील ज्योविस आयुर्वेद मध्ये पुढील उपचार मोफत करण्यात येतात. आत्तापर्यंत १० शिबिरांच्या आयोजनात सुमारे तीन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प केला आहे. ज्योविस मध्ये सौंदर्य वृद्धीसाठीही उपचार केले जातात. त्यासाठी मात्र पैसे आकारले जातात परंतु प्रतिष्ठानच्या माध्यमातून आलेल्यांना विशेष सवलत दिली जाते.’ असे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -