घररायगडफणसाड अभयारण्यात आढळले भारतातील सर्वात मोठे 'भीमपंखी' फुलपाखरू

फणसाड अभयारण्यात आढळले भारतातील सर्वात मोठे ‘भीमपंखी’ फुलपाखरू

Subscribe

जैवविविधतेने नटलेल्या मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात नुकतेच ३ दिवसीय पक्षी आणि इतर वन्यजीव गणना करण्यात आली असून, त्यात १५५ पक्षी प्रजातींची नोंद झाली. यात ‘भीमपंखी’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले आहे. महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यातील पक्षी आणि इतर वन्यजीवांची गणना करण्यात आली.  सदस्यांनी केलेल्या या पक्षी गणनेत तीन दिवसांच्या कालावधीत १५५ पक्षी प्रजातींची नोंद झाली. तसेच १७ प्रजातींचे साप, १२ उभयचर प्राणी, १६ सस्तन प्राणी, २५ प्रजातींचे कोळी, १४ सागरी जीव आणि ५० प्रजातींची फुलपाखरे यांची देखील नोंद घेण्यात आली. त्यात खाटीक, बेडूकमुखी, कोकीळ, विविध प्रजातीचे घुबड, निळ्या चष्म्याच्या मुंगश्या, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कोतवाल, तीर चिमणी, टिकेलचा कस्तुर इत्यादी दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे

उपवनसंरक्षक बी. एन. पिंगळे, सहायक वनसंरक्षक एन. एन. कुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी ही पक्षी गणना केली. तज्ज्ञ व्यक्तींकडून पडताळणी केल्यानंतरच या गणनेस मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

पक्षी गणनेच्या दरम्यान ‘भीमपंखी’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू पाहण्यात आले. ते देशात दापोलीपासून दक्षिण किनारपट्टी आणि पश्चिम घाटासह दक्षिण पूर्व घाटातील काही भागात दिसते. फणसाड अभयारण्यात सुमारे २० वर्षांपूर्वी या फुलपाखराचे दर्शन झाल्याचे ऐकीवात होते. परंतु ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता या फुलपाखराचे दर्शन झाले, ही फणसाड अभयारण्यातील या फुलपाखराची सर्वात पहिली नोंद आहे.


हे ही वाचा – पालिका आयुक्त चहल स्वत:ला समजतात तरी काय?; दरेकरांचा आदित्य ठाकरेंसमोरच सवाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -