घरताज्या घडामोडीKedarnath Visit: उद्या पंतप्रधान मोदी केदारनाथला होणार रवाना; भाजपाचा असा आहे देशव्यापी...

Kedarnath Visit: उद्या पंतप्रधान मोदी केदारनाथला होणार रवाना; भाजपाचा असा आहे देशव्यापी कार्यक्रम

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शुक्रवारी उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे जाणार आहेत. उद्या पहाटे ६.४० वाजता मोदी देहरादूनहून केदारनाथ धामसाठी रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला सकाळी ७.३५ वाजता हेलिकॉप्टरने पोहोचलीत. त्यानंतर सकाळी ८ ते ८.३० वाजपर्यंत मोदी मंदिरात पूजा करतील. पूजा करून झाल्यानंतर मोदी बांधकामाचा आढावा घेतला. त्यानंतर सकाळी ९.४० वाजता आदि शंकराचार्यांच्या समाधीस्थळी पोहोचतील. येथे समाधीचे उद्घाटन आणि आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करतील. मग ९.५० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील.

भाजपाने हा ऐतिहासिक सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमाची योजना तयार केली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे एकूण मिळून ८७ मंदिरांना भेट देण्यासाठी साधू, भक्त आमि सामान्य लोकांना आमंत्रित केले आहे. ही सर्व मंदिरे आदि शंकराचार्यांनी त्याच्या प्रवासादरम्यान घेतलेल्या मार्गावरील प्रस्थापित केलेली आहेत.

- Advertisement -

आदि शंकराचार्यांच्या केदारनाथला जाण्यासाठी मार्गावरील सर्व ८७ मंदिरांमध्ये भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

१) सोमनाथ ज्योतिर्लिंग – प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील
गुजरातच्या सौराष्टमध्ये अरबी समुद्राच्या किनारी स्थित आहे. देशातील पहिले ज्योतिर्लिंग हे सोमनाथ नावाने ओळखले जाते. शिवपुराणानुसार, जेव्हा चंद्राला प्रजापती दक्षाने क्षयरोगाचा शाप दिला होता तेव्हा याठिकाणी शंकराची पूजा आणि तपश्चर्या केल्याने चंद्र शापमुक्त झाला होता. स्वतः चंद्रदेवाने या ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

२) मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग – किशन रेड्डी
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर श्रीशैल पर्वतावर स्थित आहे. याला दक्षिण कैलास म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाचे दर्शनाने सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते.

३) महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – शिवराज सिंग चौहान, धर्मेंद्र प्रधान
भोजपुर- बीडी शर्म (प्रदेशाध्यक्ष)

४) ओंकारेश्वर – कैलास विजय वर्गीय
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशचा मालवा क्षेत्रात स्थित आहे. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर आहे. तीर्थयात्री सर्व तीर्थोंतून पाणी घेऊन ओंकारेश्वरला अर्पित करतात तेव्हा त्यांचे सर्व तीर्थ पूर्ण होतात, असे मानले जाते.

५) केदारनाथ ज्योतिर्लिंग – पंतप्रधान नरेंद्र मोदी
केदारनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तराखंडमधील अलखनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर केदारच्या शिखरावर आहे. इथून पूर्व दिशेला बद्री विशालचे बद्रीनाथ धाम मंदिर आहे. भगवान केदारनाथच्या दर्शनाशिवाय बद्रीनाथची यात्रा अपूर्ण आणि निष्फल आहे, असे म्हटले जाते.

६) भीमाशंकर ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रातील पुण्यापासून जवळपास १०० किलोमीटर दूर डाकिनीमध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थित आहे. येथील असलेले शिवलिंग खूप मोठे आहे. यामुळे मोटेश्वर महादेव देखील म्हटले जाते.

७) विश्वनाथ ज्योतिर्लिंग – योगी आदित्यनाथ, स्वतंत्र देव सिंह (प्रदेशाध्यक्ष)
उत्तरप्रदेशातील वाराणसी शहरात गंगा नदीच्या किनाऱ्यावर बाबा विश्वनाथचे मंदिर आहे. ज्याला विश्वनाथ ज्योतिर्लिंग नावाने ओळखले जाते. कैलाश सोडून भगवान शिवशंकरांनी येथे त्यांचे कायमचे निवासस्थान केले होते, असे मानले जाते.

८) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
नाशिकपासून ३० किलोमीटर दूर पश्चिमेला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर हे काळ्या दगडांचे मंदिर आहे. गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शंकरांनी या ठिकाणी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आणि हे त्र्यंबकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले, असे शिवपुराणात म्हटले आहे.

९) वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – रघुराव दास, दीपक प्रकाश (प्रदेशाध्यक्ष), निशिकांत दुबे
झारखंड येथील देवघरमध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे. येथील मंदिराला वैद्यनाथधाम नावाने ओळखले जाते. एकदा रावणाने तपाच्या बळावर शंकरांना लंकेत नेण्याचा प्रयत्न केला, पण वाटेत अडथळे आल्याने येथेच शंकर प्रस्थापित झाले, असे म्हटले जाते.

१०) नागेश्वल ज्योतिर्लिंग – भूपेंद्र पटेल (मुख्यमंत्री)
गुजरातच्या बडोदा क्षेत्रातील गोमती द्वारकाजवळ नागेश्वर मंदिर स्थित आहे. धार्मिक पुराणात भगवान शिवशंकरांना नागांचा देवा म्हणून म्हटले आहे आणि नागेश्वरचा अर्थ होतो नागांचा ईश्वर. भगवान शिवशंकरांच्या इच्छेनुसार या ज्योतिर्लिंगाचे नामाकरण झाल्याचे मानले जाते.

११) रामेश्वर ज्योतिर्लिंग
तामिळनाडूतील रामनाथम नावाच्या ठिकाणी भगवान शिवशंकरांचे ११वे ज्योतिर्लिंग आहे. रावणाच्या लंकेत जाण्यापूर्वी भगवान रामाने स्थापित केलेले शिवलिंग रामेश्वर या नावाने जगप्रसिद्ध झाले, असे म्हटले जाते.

१२) घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील दौलताबादच्या जवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. १२ ज्योतिर्लिंगामधील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग घुश्मेश्वर नावाने ओळखले जाते.

या १२ ज्योतिर्लिंगांशिवाय भाजपचे सर्व मोठे नेते आदि शंकराचार्यांच्या केदारनाथ धामच्या मार्गावर येणाऱ्या या ठिकाणी मुक्काम करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -